अंमली पदार्थ तस्करास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १६० ग्रॅम MD पावडर केले जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुर येथील ड्रग माफियाकडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच
अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीतीच्या आधारे दिपक कृष्णा वर्मा, वय-२८ वर्ष, धंदा चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मूल रोड, चंद्रपूर तसेच आरोपी आशिष प्रकाश वाळके, वय – ३० वर्ष, धंदा- मजुरी, आंबेडकर कॉलेज जवळ, मित्रनगर, चंद्रपुर हे पांढ-या रंगाचे डिजायर कार क्रं. एम. एच. ४९ एएस-२७०४ ने फॉरेस्ट अकादमी, मुल रोड, चंद्रपुर येथे येत आहे







अशा खबरेवरून मुल रोड, फॉरेस्ट अकादमी समोर नाकाबंदी करून असतांना पांढ-या रंगाचे डिजायर कार क्रं. एम. एच. -४९ एएस-२७०४ येत असतांना दिसुन आली. सदर वाहनास थांबवुन वाहना मधील दिपक कृष्णा वर्मा, वय-२८ वर्ष, धंदा-चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मुल रोड, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन 160 एम. एच. ४९ एएस-२७०४ असा एकुण १६०
gm MD (मेफोड्रॉन) इस पावडर सह पांढ-या रंगाचे डिजायर कार
16,12,500/- रू माल जप्त करून आरोपीस विरूध्द पोलिस स्टेशन, रामनगर येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार,पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे,रजनिकांत पुट्ठावार,  दिपक डोंगरे, इम्रान खान,नापोशि किशोर वाकाटे, पोशि शशांक
बदामवार, हिरालाल गुप्ता,अजित शेंडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!