
सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक
सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक
जळगाव – गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत दुचाकी चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर पकडण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 04 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी नामे सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला, रा.सिंधी कॉलनी जळगाव यांची दि.25ऑक्टोबर रोजी दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी होंडा कंपनीची फॅशन प्रो ब्लॅक रंगाची मो.सा.क्र. MH-19 BP – 1133 मो.सा. ही सेंट टेरेसा हायस्कुल च्या मागुन मेहरुण तलाव परीसर येथुन चोरीला गेली होती. या मो.सा. चोरीबाबत फिर्यादीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल केला आहे.


वाढत्या मोटार सायकल चोरीच्या तपासावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, पोस्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत सावळे रा. सुप्रीम कॉलनी हा चोरीच्या मोटारसायकल घेवुन फिरत आहे. या मिळालेल्या खात्रीलायक माहिती च्या आधारे तो राहत असलेल्या परीसरात दोन टिम तयार करुन त्याच्या मागावर ठेवुन त्यास एका दुचाकीवर जात असतांना त्याचा पाठलाग करुन त्यास पकडून त्याचे जवळ असलेल्या शाईन मोटार सायकल क्र. एमएच 39 आर 4756 मिळून आली. मो.सा. च्या कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने सदर मो.सा. ही नंदुरबार येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने अजुन 03 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास दि.01 डिसेंबर रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 05 डिसेंबर पावेतो 04 दिवस पो.क. रीमांड दिला. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याच्याकडुन 1) 30,000/- रुपये किमतीची होंडा कंपनीची फॅशन प्रो ग्रे ब्लॅक रंगाची मो.सा. क्र. MH-19 BP-1133, 2) 50,000/- रुपये किमतीची सी बी शाईन मो सा क्र. एमएच 39 आर 4756, 3) 45000/- रुपये किंमतीची चॉकलेटी रंगाची होंडा ॲक्टीवा क्र.एम एच 12 क्यु एक्स 6710, 4)20,000/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची शाईन मो.सा. क्र. एम.एच 19 सीजी 6978 या मध्ये सदर आरोपीकडुन 04 मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका अल्ताफ पठाण, पोहका, गणेश शिरसाळे, पोना, किशोर पाटील, पोना. योगेश बारी, सचीन पाटील, विकास सातदीये, पोका. छगन तायडे, ललीत नारखेडे यांनी केली आहे.



