दोन तडीपार गुंडाना युनीट २ ने धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शहरात घातक शस्त्र घेऊन दहशत पसरविणार्या दोन  तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. 

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अमरावती शहर अरविंद चावरिया यांनी आदेशित केल्याप्रमाणे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंदे,गुन्हेगार चेक करने कामी गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर यांना. पेट्रोलिंग दरम्यान दिनांक 21/06/2025 रोजी गुप्त माहीती मिळाली की  पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा हद्दीतील स्मशानभुमी यशोदानगर अमरावती येथे तडीपार इसम महेश कृष्णा खोब्रागडे वय 22 वर्षे रा. लुंबिनी नगर अमरावती हा शस्त्रासह फिरत आहे अशा मिळालेल्या माहीतीवरुन नमुद ठिकाणी जाऊन त्यास शस्त्रासह ताब्यात घेऊन पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला





तसेच पोलिस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील स्मशानभुमी विलासनगर येथे तडीपार इसम स्वप्नील उर्फ खट्‌या सुभाष भगत वय 25 वर्षे रा. विलासनगर अमरावती हा सुद्धा शस्त्रासह फिरत आहे अशा माहीतीवरुन त्यास सुद्धा शस्त्रासह विलासनगर येथुन ताब्यात घेऊन त्याचेवर पो.स्टे. गाडगेनगर येथे कलम 142 मपोका. सहकलम 4/25 आर्म अॅक्ट सहकलम 135 मपोका. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदर दोन्ही आरोपीतांविरुद्ध पो.स्टे. फ्रेजरपुरा, गाडगेनगर येथे गुन्हे नोंद करुन त्यांचे ताब्यातुन दोन वेगवेगळे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.



सदरची कारवाई पोलिस आयुक्त  अरविंद चावरीया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त  कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे  यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोहवा गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, नापोशि मंगेश शिंदे, पोशि योगेश पवार, राजीक रायलीवाले विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चालक पोहवा संदीप खंडारे, चेतन शर्मा, राहुल दुधे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!