धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर  दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात…..

धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती येथुन अशोक लेलेंन्ड १८१५ वाहन क्र. एम.एच.१४ एल.एक्स.२२८० मधे पशुखाद्य भरुन वाशिम मार्गे जवळाबाजार जि. हिंगोली असे जात होता. अमरावतीचे बाहेर आल्यानंतर चालकाने विश्राती घेवुन निघाला असता रात्री अंदाजे ०३.०० वाजताचे दरम्यान म्हसला फाट्याजवळ गतीरोधक असल्याने वाहनाचा वेग कमी केला. त्याचवेळी मागुन एक पांढ-या रंगाची टाटा कंपणीची एम.एच.२६ पासिंग असलेली कार अज्ञात इसमांनी अशोक लेलॅन्ड वाहनाचे पुढे आडवी लावली. कारचा चालक कार मध्ये थांबला व ०४ ईसम उतरले, त्यांनी अशोक लेलॅन्डचे चालकाला खाली ओढुन चाकुचा धाक दाखवुन त्याला तेथेच सोडुन, अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन पशुखाद्यासह अंदाजे एकुण २५ लक्ष ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन घेवुन गेल्याने अज्ञात आरोपींविरुध्द पो.स्टे.धनज अप.क्र. १६०/२०२५ क. ३१०(१) (दरोडा) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलिस स्टेशन धनजचे ठाणेदार सपोनि भारत लसते यांना आदेशीत केले होते यावरुन त्यांनी तात्काळ तपास पथक तयार करुन. चालकास माहिती विचारली असता चालकाने सांगीतलेली घटना व आरोपींचे वर्णन यावरुन तपासाची चक्रे फिरवुन संशयीत आरोपी पांडुरंग तातेराव मेथे यास निष्पन्न केले



तसेच सदर गुन्ह्यात गोपनीय आणि तांत्रीक माहिती  घेतली.असता  मिळालेल्या माहितीवरुन तांत्रीक पध्दतीने तपास करुन. वाहन महामार्गावरुन चोरीस गेलेल्या पशुखाद्याच्या मानोरा, दिग्र वाहन पशुखाद्यासह ताब्यात घेतला, आरोपीनी सदर गुन्हयात



सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक लता फड,उपविभागिय पोलीस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि भारत लसंते, पोउपनि शिंदे, अंमलदार गजानन वर, आशिष खाडरे, राजेश अंबुरे, अफसर रायलीवाले, मनोज डहाके, किरण गुहे, प्रफुल गावडे सर्व पो.स्टे धनज व पो.स्टे पुसद येथील सपोनि. केदारे, शेंबडे, अंमलदार आकाश, भगत, मनोज, दातीर यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!