
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आरोपी गजाआड
यवतमाळ: १६ घरफोड्या करणारे दोन आरोपी गजाआड; १५.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
यवतमाळ शहरात वाढत्या घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करत १६ गुन्हे उघडकीस आणले असून दोन आरोपींना अटक केली आहे.

संशयावरून पाठलाग आणि अटक: स्थानिक गुन्हे शाखेचे ‘पथक अ’ बाभुळगाव ते करळगाव घाटामध्ये पेट्रोलिंग करत असताना, दोन संशयित इसम विना नंबरच्या पॅशन प्रो मोटारसायकलवर तोंड बांधून यवतमाळच्या दिशेने जाताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवले आणि त्यांची चौकशी केली. आरोपींनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे दागिने, रोकड आणि चोरीचे साहित्य मिळून आले.
अटक करण्यात आलेले आरोपी:

१. सागर उर्फ राजरतन पवार (वय ३५ वर्षे, रा. शिवाजीनगर, चांदूर रेल्वे, जि. अमरावती)
२. विजयसींग मानसींग पवार (वय २५ वर्षे, रा. तरोडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती)

एकूण १६ गुन्ह्यांची कबुली: आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ, बाभुळगाव, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी या परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे खालील पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १६ गुन्हे जबरी उघडकीस आले आहेत:
- जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (किंमत एकूण १५,६८,७१०/- रुपये): गुन्ह्यामध्ये गेलेला मूळ मुद्देमाल ७,७८,७५७/- रुपयांचा होता, मात्र आजच्या बाजारभावानुसार त्याची एकूण किंमत १५,६८,७१०/- रुपये आहे. पोलिसांनी खालील साहित्य जप्त केले आहे.
- १. सोन्याचे दागिने: वजन अंदाजे १०८.६१ मिलिग्राम (आजचा बाजारभाव: १५,६८,७१०/- रुपये)
-
२. चांदीचे दागिने: वजन २३४ ग्राम (किंमत ५४,९९०/- रुपये)

-
३. नगदी रोकड: ८९,३००/- रुपये
-
४. इतर साहित्य: घरफोडीसाठी वापरले जाणारे पेचकस, पंचीस, लोखंडी हुक, टॉर्च आणि विना क्रमांकाची मोटारसायकल.
कारवाई करणारे पथक: ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोउपनी सागर इंगळे, पोलीस अंमलदार अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, रुपेश पाली, निलेश राठोड, रितुराज मेढवे, सुनिल पेठणे, प्रतिक नेवरे, देवेंद्र होले आणि आकाश सुर्यवंशी यांचा समावेश होता.




