
विमानात एअर होस्टेस सोबत अश्लील चाळे करणारा बांग्लादेशी अटकेत…
मुंबई- विमानात कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करणाऱ्या प्रवाशाला
मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मस्कतहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंट्ससोबत हा प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमातील सर्वच प्रवाशी चकीत झाले. प्रवाशाने कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करत त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. मोहम्मद दुलाल असं या ३० वर्षीय आरोपचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विस्तारा फ्लाइट मुंबईत पहाटे ४.२५च्या सुमारास लँडिंग करणार होती. त्याआधी ३० मिनिटे आधी हा प्रकार घडला आहे. दुलाल ढाक्याहून कनेक्टिंग फ्लाईटद्वारे मुंबईत आल्यावर दुलालला अटक करण्यात आली होती. त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुलालला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांनी युक्तीवाद करताना, दुलाल हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे असे सांगितले. न्यायालयाने प्रवाशाला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फ्लाईट अटेंडंच्या माहितीनुसार,
आरोपीने तिला मिठी मारली आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.मात्र उपस्थितांना हस्तक्षेप करत हा प्रकार रोखला.


