
सालेकसा पोलिसांनी गोतस्करी करणारे केले जेरबंद ७ गोवंशाची केली सुटका…
सालेकसा(गोंदिया) – सवीस्तर व्रुत्त असे कीव पोलिस अधीक्षक, . निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणेदार यांना जिल्ह्यांतील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाई करून अंकुश व आळा घालण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक, निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचनेप्रमाणे, आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत आहे. त्त्यानुसार प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी, आमगाव किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे सालेकसा पोलीसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु होतीत्यानुसार दिनांक 22-09-2022 रोजी सालेकसा पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मौजा- निंबा ते जांभळी जाणाऱ्या रोडावर अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली असता एक अशोक लेलँड कंपनीचा मालवाहक ट्रक क्र. एम. एच-40 सी. डी. 3407 मिळुन आले. त्यात दोन ईसंम
1)अरजाफ असफाख शेख कुरैशी वय 30 वर्षे राहणार-रामनगर गोंदिया,


2) वसीम सलीम खान वय 35 वर्षे राहणार चंगेरा, गोंदिया

हे मिळून आलेत. त्यांना चौकशी करून मालवाहक ट्रकचे डाल्याची पाहणी केली असता डाल्यात लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 7 जनावरे दोरीने दाटी वाटीने डांबून जनावरांना कोणत्याच प्रकारचे चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधलेल्या स्थितीत मिळुन आले. गोवंश जातीचे लहान मोठी जनावरे कि.अं.70 हजार. व मालवाहक ट्रक कि. अं. 5 लाख /-रु असा एकुण 5 लाख 70 हजार /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पो.ठाणे सालेकसा येथे *आरोपी
*1) अरजाफ असफाख शेख कुरैशी वय 30 वर्षे राहणार-रामनगर गोंदिया* ,

*2) वसीम सलीम खान वय 35 वर्षे राहणार चंगेरा, गोंदिया*
यांचेविरूद्ध पो.ठाणे सालेकसा येथे अप क्र. 338/2023 कलम 5 (अ) (1), 5 (अ) (2),5 (ब) (6), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 11 (घ) (च) (ज), (झ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने गौशालेत दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक, निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, उप-विभागिय पोलिस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सालेकसा पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पो.उप.नि.अजय पाटील, पोशि.अजय इंगळे,विकास वेदक, म.पो.शि. तुरकर पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.


