महीलेचा खुन करुन पसार होणार्या २ आरोपीस बुलढाणा पोलिसांनी वसई-पालघर येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.14.10.2023 रोजी फिर्यादी भागवत अनंता इंगळे वय 30 वर्षे, रा. चंदनपूर ता. चिखली यांचे फिर्यादवरुन पो.स्टे. अंढेरा येथे गु.र.नं. 303/2023 कलम 302, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी दि.13.10.2023 रात्री 09/00वा. ते दि. 14.10.2023 चे सकाळी 02/30वा. सुमारास त्यांचे सोबत असलेल्या महिलेचा गळा आवळून, तिला जिवे ठार मारुन घटनास्थळावरुन पळून गेले होते. सदर प्रकरणी गुन्ह्यातील फरारी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेवून, त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणे बाबत . सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक  अशोक लांडे स्था. गु.शा. बुलढाणा, सपोनि विकास पाटील प्रभारी अधिकारी पो.स्टे. अंढेरा यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.त्यानुसार दि. 15/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्तपणे गुन्ह्यातील आरोपी शोध कारवाई राबविली. सदर शोध मोहिमे दरम्यान पथकाला माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फरारी आरोपी हे बंगलौर-अजमेर एक्सप्रेसने वसईमार्गे परराज्यात निघून जात आहेत. त्या माहिती प्रमाणे नमुद आरोपींनी ताब्यात घेणेकामी पो.स्टे. वसईरोड लोहमार्ग, पो.स्टे. कल्याण लोहमार्ग, पो.स्टे. पुणे लोहमार्ग यांची आवश्यक्ते प्रमाणे मदत घेवून, गुन्ह्यातील आरोपी

1)अलीमोद्दीन मिया,





2) जाकीर उल दायी, दोन्ही रा. जहांगीरपुर, फैजपूर, दक्षिण मिदनापूर



यांना दि.15.10.2023 रोजी वसई – जिल्हा पालघर या ठिकाणी स्था.गु.शा. आणि पो.स्टे. अंढेरा पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. पकडलेल्या नमुद आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईकामी पो.स्टे. अंढेरा यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पो.स्टे. अंढेरा यांच्या कडून करण्यात येत आहे.



सदरची कारवाई सुनील  कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये अशोक थोरात-अपर पोलिस अधीक्षक खामगांव,  बी.बी महामुनी, अपर पोलिस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात, सपोनि. विकास पाटील प्रभारी अधिकारी- पो.स्टे. अंढेरा, सपोनि. निलेश सोळंके, पोलिस अंमलदार गजानन माळी, पंकज मेहेर, विलास भोसले- नेमणूक- स्था. गु. शा. बुलढाणा पोलिस अंमलदार सिध्दार्थ सोनकांबळे, भरत बोबडे पो.स्टे. अंढेरा आणि पोलिस अंमलदार राजू आडवे तांत्रीक विष्लेषण विभाग, सायबर पो.स्टे. बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!