पोलिस प्रबोधीनी,हैद्राबाद यांचे ७५व्या वर्षपुर्तीनिमित्य फिटराईस ७५ मिनीमॅरॅाथान स्पर्धेचे आयोजन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा –  सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमी (SVPNPA) हैद्राबादचे ७५ वे वर्षपुर्ती निमीत्य Fit Rise 75 या मिनी मॅराथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पोलिस  दलातील सदस्य, त्यांचे कुटुंब व नागरीक यांचेसाठी तयार करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरुप पाहता सदरचा कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दत्तीने आयोजित करण्यात होता . याचा मुख्य उद्देश हा की  प्रत्येक सहभागी सदस्यांना नियमित व सात्यत्यपुर्ण सहभागाअंती ५ किमी अंतर सहज धावण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतःची शारीरिक क्षमता विकसीत करणे हा आहे. त्यानुसार
दिनांक २७.१०.२०२३ रोजी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री, भारत सरकार श्री. अमित शहा यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. वर्धा पोलिस दलातील पोलिस
अधिकारी, पोलिस अंमलदार व पोलिस पाल्यांकरीता ५ किमी रनींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील ४८ अधिकारी, ४४२ पोलीस अंमलदार व एका पोलिस पाल्यानी सहभाग घेतला.
सदर स्पर्धेमध्ये . पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष भाग घेवून ५ किमी अंतराची रनींग पुर्ण केली असुन  अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी प्रथम येणाऱ्या
दहा स्पर्धकांमध्ये स्वतःचे स्थान निश्चित केले आहे.हेही तितकेच महत्वाचे
पुरुष स्पर्धकांपैकी

प्रथम क्रमांक – प्रद्युम्न फड,





द्वितीय अंकित जिभे,



तृतीय – मनोज सावरबांदे



तसेच महिला स्पर्धकांपैकी

प्रथम क्रमांक – सुनैना डोंगरे,

द्वितीय – जयश्री बावणे,

तृतीय – अलका राठोड

यांनी पटकावला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना येत्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये सन्मानचिन्ह व
प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात  येणार आहे. तसेच स्पर्धेमधील उर्वरित स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पोलिस अधीक्षक, वर्धा नूरुल हसन यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे आभार मानले व पोलिस विभागामध्ये फिटनेस खुप महत्वाचा भाग आहे, आपण
फिट नसलो तर आपले कर्त्यव्य व्यसस्थित बजावता येत नाही. सर्वांनी स्वतःसाठी वेळात वेळ काढून कमीत कमी एक तास नियमित व्यायाम करावा असे पोलिस अधीक्षक यांनी मोलाचा सल्लाही त्यांनी दिला
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक (गृह) मनोज वाडिवे, पोलिस
निरीक्षक कांचन पांडे, संजय गायकवाड, गोपाल भारती, सहा. पोलिस निरीक्षक रविंद्र रेवतकर, लक्ष्मण लोकरे, विनीत घागे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले तसेच पोलिस मुख्यालय, वर्धा येथे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्याकरीता राखीव पोलिस निरीक्षक कमलाकर घोटेकर व पोलिस मुख्यालय
येथील कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!