आत्ताची मोठी बातमी – नाशिक पोलिस आयुक्तांच्या पथकाचा सोलापूरातील मोहोळ येथे छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सोलापूर –  नाशिक,छत्रपती संभाजीनगर,पालघर नंतर  आणि आता सोलापूरमधील एमडी ड्रग्सचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. या घटना ताज्या असतानाच आता सोलापुरातही ड्रग्सचा कारखाना आढळून आला आहे.

सर्वत्र ड्रग च्या कारखान्यांवर धाड सत्र सुरु आहे मग नाशिक शहर पोलिस कसे मागे राहतील त्यांनी सुध्दा  सोलापुर येथे एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर छापा टाकला. पोलिसांकडून या
छाप्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चामाल जप्त करण्यात आला आहे.





महत्वाचे म्हणजे नाशिक पोलिसांच्या तीन पथकानं सोलापुरात जाऊन ही कारवाई केली आहे. एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये,पालघर येथे  देखील पोलिसांनी छापेमारी केली होती. या दोन्ही शहरातून मोठ्याप्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.



नाशिक पोलिसांच्या तीन पथकानं मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधीचं ड्रग्स जप्त करण्यात
आलं आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!