
परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा या महाराष्ट्र शासनाच्या “बालस्नेही” पुरस्काराने सन्मानित…
परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर ह्या महीला व बालकल्याण महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणाऱ्या ,बालस्नेही पुरास्काराने सन्मानित…
परभणी – दिनांक 22/11/2023 रोजी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांचा पुणे येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ यांचे संयूक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात 6 अपहृत अल्पवयीन बालकांची सुखरूप सुटका केल्यामूळे “बाल स्नेही “पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
परभणी जिल्ह्यात सन-2022 पासून अल्पवयीन मुलांचे अपहरणांचे गुन्हे दाखल झालेले होते. त्याचा शोध लागलेला नसल्याने पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य
ओळखून सदर गुन्ह्याचा तपास अनैतीक वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) कडे वर्ग करून स्वत: लक्ष घालून तपास कार्य सुरू करण्यात आले होते तपासादरम्यान हा प्रकार हा ह्युमन ट्रॅफीकींगचा असून यात आंतराज्यीय टोळी सक्रीय असल्याचे समोर आले होते तसेच अपहृत बालकांची विक्री वेगवेगळ्या राज्यात होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
परभणी पोलीसांचे पथकाने सदरचा तपास पथकाने सतत 12 दिवस अहोरात्र परिश्रम घेतले व सदर गुन्ह्यांचा तपास करून यातील आरोपींचा शोध घेवून 21 आरोपींना परभणी, हैद्राबाद, मुंबई, आंध्रप्रदेश वसतेलंगना येथून अटक करण्यात आली देशपालम (आंध्रप्रदेश), जग्गीयापेठ (आंध्रप्रदेश), सिंगारेड्डीपालम (तेलंगना), विसन्नापेट (आंध्रप्रदेश), हैद्राबाद (तेलंगना) या ठिकाणांवरून यातील अपहृत बालकांची सुखरूप सुटका करून त्यांना त्यांचे कायदेशीर पालकांचे स्वाधीन करण्यात आलेले आहे.
यावेळी महिला व बालविकास मंत्री मा. श्रीमती आदिती तटकरे, विधानसभा विरोधी पक्ष नेते,श्री.विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) श्री. दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव श्री शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक श्री. संपर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी श्रीमती. राजलक्ष्मी नायर, होप फोर
चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला व बालविकास उपायुक्त श्री. राहुल मोरे उपस्थित होते.




