ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

पुणे : अमली पदार्थ तस्कर (ड्रग्ज माफिया) ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. या सोबतच कारागृहातील पोलीस कर्मचारी मोईस शेख याला पण अटक केली आहे.





ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७ ,रा. रक्षकनगर, खडकी) याला मंगळवारी अटक करण्यात आली. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. मोईस शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.



या मध्ये येरवडा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच महेंद्र शेवते याला अटक करण्याची मागणी धंगेकर यांनी केली होती. दरम्यान, ललित पाटील प्रकरणात चौकशीनंतर गुन्हे शाखेने शेवते आणि पोलीस कर्मचारी मोईस शेख याला सुध्दा अटक केली आहे. शेखच्या मोबाइल क्रमंकावरुन दि.२ ऑक्टोबर रोजी ललितने ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आराहाना यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणात कांबळे, बलकवडे, आरहाना यांनाही अटक करण्यात आली होती. शेवते आणि शेख यांना अटक करुन शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, आणि सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!