कुठलाही पुरावा नसतांना ४ तासात अनोळखी खुनीस मुंबंई येथुन केली अटक,वाकड पोलिसांची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आपले हातून झालेल्या मारहानीतुन  खुन झाल्याचे कळताच फरार झालेल्या आरोपीस ०४ तासात केली अटक,फिरस्ता इसमाने दिली पोलिसांची तपासाला कलाटणी…

पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम.एल.सी.नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी रुग्नालयात आलेला रुग्ण योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा येथे मारहाण झाल्याने रुग्ण औंध रुग्नालयात प्रथम उपचार झाल्यानंतर त्यास पुढील उपचारकामी ससुन रुग्नालय  येथे भरती करण्यात आले होते.





सदर पेशंट  योगेश सुर्वे हे दि.०६/१२/२०२३ रोजी रात्री १०.०० वा. उपचारादरम्यान मयत झाले आहेत अशी माहीती ससुन रुग्नालयातुन प्राप्त झाल्याने  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस स्टेशन यांनी त्यांच्या अधिनस्त तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनेचे शहानिशा करून चौकशी करण्याबाबत आदेश दिले. त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनकडील एक अधिकारी व अंमलदार असे ससून हॉस्पीटल येथे मयताबाबत पुढील कार्यवाही करणेकामी रवाना करण्यात आले होते मयत योगेश सुर्वे याचा प्राप्त फोटो व अपुर्ण नाव एवढीच माहिती सुरुवातीला प्राप्त होती. तपास पथकातील
अधिकारी व अंमलदार असे काळेवाडी फाटा येथे जाऊन चौकशी सुरु केली. काळेवाडी फाटा येथील रिक्षावाले, फेरीवाले दुकानदार यांना मयताचा फोटो दाखवून त्याचेबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु मयतास कोणीही ओळखत नव्हते. काळेवाडी फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या गजानन नगर येथील मोकळ्या जागे शेजारी मयत याचा फोटो दाखवून चौकशी करीत असताना एक फिरस्ता ज्याचे नाव छत्तीस ( मुळचा छत्तीसगडचा
असल्याने त्याला छत्तीस म्हणतात) याने मयताचा फोटो बघत तो ड्रायव्हर असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मयत ज्या ठिकाणी टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन काम करत असे तेथे जाऊन चौकशी केली असता मयत योगेश सुर्वे हा एकटाच मिळेल त्या ठिकाणी राहत असे व ड्रायव्हर म्हणून काम करत असे, तसेच त्याला पत्नी होती परंतु अनेक वर्षापासुन तो एकटाच राहतो अशी माहिती प्राप्त झाली.
मयताबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्याची दिनांक ०२ / १२ / २०२३ रोजी कोणासोबत भांडण झाल होतं का  याबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तेथील स्थानिक रहिवाशी, फिरस्ते, कामगार यांचेकडे विचारपुस केली परंतु कोणासही भांडणाबाबत काहीही माहिती नव्हते. तपास पथक गजानन नगर येथे चौकशी करीत असताना एक लहान मुलगा पोलिस काय चौकशी करतात पाहण्यासाठी आला असता त्याला मयत सुर्वे याचा फोटो दाखविला असता त्याने
मयत हा त्याच भागातील ड्रायव्हर असल्याचे सांगत त्याला सनीने काही दिवासांपूर्वी मारले होते असे सांगितले.सदर लहान मुलाकडून सनी कोठे राहतो याबाबत विचारले असता त्याला सनीचा भाचा जो त्याचे वयाचाच आहे याचे फक्त नावच माहित होते. त्यामुळे परत तपासात अडचण निर्माण झाली. सनीचा भाचा याबाबत माहिती
काढण्यासाठी त्या परिसरातील काही लहान मुलांना बोलावले असता त्यापैकी एका लहान मुलाला त्याचे घर माहित होते. त्यानंतर सदर पथक  लहान मुलाच्या साहाय्याने त्याच्या घरी गेले असता सनीची बहिण घरी मिळून आली. तिच्याकडे विचापुस केली असता सनिचे नाव अनिकेत ऊर्फ सनी रमेश काळे, वय २६ वर्षे, रा. अशोकनगर झोपडपट्टी, मॉडेल हायस्कुलशेजारी, वाशी नाका, चेंबुर, मुंबई असे समजले. त्याचे बहिणीला दिनांक ०२/१२/२०२३
रोजी सनीचे एका व्यक्ती बरोबर भांडण झाल्याचे माहित होते व सनीने त्या व्यक्तीस मारहाण केली होती त्यामुळे सनी ०३ / १२ / २०२३ रोजी चेंबुर, मुंबईला परत गेला होता. त्यामुळे सदरचा गुन्हा अनिकेत ऊर्फ सनी काळे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर  वरिष्ठांची परवानगी घेऊन चेंबुर, मुंबई येथे जाऊन तांत्रिक व पारंपारिक पध्दतीने तपास करुन अशोकनगर झोपडपट्टीमधील अनिकेत ऊर्फ सनी काळे याला ताब्यात घेतले. आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे याच्याकडे दिनांक ०२/१२/२०२३ रोजी झालेल्या प्रकाराबाबत विचारणा करता त्याने सांगितले की, तो आणि मयत योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे, रा. नखाते नगर, रहाटणी, पुणे हे
एकत्र असताना मयत योगेश सुर्वे याने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्यांचेत किरकोळ वाद झाल्याने त्याने मयत योगेश सुर्वे यास लाथा बुक्यांनी पोटावर छातीवर व पाठीवर मारहाण केली. त्याने केलेल्या मारहाणीमध्ये मयत योगेश सुर्वे यास जबर दुखापत झाल्याचे त्याला जाणीव होती त्यामुळे तो चेंबुर, मुंबई येथे पळून गेला होता.
तपास पथक झालेली भांडणे व आरोपी याबाबत तपास करत असताना पोउपनि रोहित दिवटे व स्टाफ मयत योगेश सुर्वे याचे पुढील कार्यवाहीसाठी ससुन हॉस्पीटल पुणे येथे गेले होते. मयत योगेश सुर्वे याचे शवविच्छेदन झाल्यानंतर अॅडव्हान्स सर्टिफिकेट मध्ये मयताचे मृत्युचे कारण पोटावर जब्बर मारहाण झाल्याने पोटाची आतडी फाटल्याने मयत झाला आहे असे प्राप्त झाले आहे. त्यामुळे झाले तपासाच्या आधारे व शवविच्छेदनातील  मृत्युचे
कारण यावरुन आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे याने योगेश सुर्वे याचा शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून त्याला मारहाण करीत जबर दुखापत करत त्याचा खून केला आहे. असे निष्पन्न झाले व  मयताचे कोणीही नातेवाईक तक्रार देणेस उपलब्ध नसल्याने वाकड पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन आरोपीविरुध्द् वाकड पोलुस ठाणे येथे  गु.र.नं. ११७५/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अशा प्रकारे वाकड पोलिस ठाणे तपास पथक यांनी खून झालेल्या व्यक्तीचा फोटो व अपुर्ण नाव यावरुन कोणतीही इतर माहिती प्राप्त नसताना कोशल्यपुर्ण तपास करत चार तासाच्या आत मयताची ओळख पटवत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस चेंबुर मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे यास दिनांक १३/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त झाली आहे.
सदरची कारवाई  विनयकुमार चौबे सारे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड,  डॉ. संजय शिंदे,सह पोलिस आयुक्त,  वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त,  डॉ. काकासाहेब डोळे ,पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड  डॉ. विशाल हिरे, सहा पोलिस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली  गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि, सचिन चव्हाण, पोउपनि, रोहित दिवटे, सपोफी बिभीषण कन्हेरकर, सफौ बाबाजान इनामदार,राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, बंदु गिरे, स्वप्निल खेतले,दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, पोना.
प्रशांत गिलबीले,राम तळपे, पोशि अजय फल्ले ,भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, विनायक घारगे,रमेश खेडकर, सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!