सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे आदेशाने कामशेत पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोनावळा उपविभागिय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा कार्यभार स्विकारल्यापासुन  अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य
करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहे…

लोनावळा- सवीस्तर व्रुत्त असे की, सहाय्यक पोलिस अक्षिक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठ येथे काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून दि. १४/१२/२०२३ रोजी रोजी सहा. पोलिस अधिक्षक  सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोनावळा उपविभाग व कामशेत पोलिस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचुन केलेल्या कारवाईत कामशेत बाजारपेठेतील





१ ) भरत चंपालाल जैन यांच्या मे. शिवम टेडर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे या दुकानाचे गोडाऊनमधुन, तसेच



२) घिसाराम सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथील मेट्रो मेडीकलचे बाजुस असलेल्या किराणा दुकानामधुन व राहते घरातुन, व



३) महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स, छत्रपती संभाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे या दुकानामधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला इ. पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळुन आल्याने त्यांचेवर
कामशेत पोलिस स्टेशन गु.रजि. नं ३७५ / २३ भादंवि कलम ३२८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा मानके कायदा, २००६ चे कलम ५९ व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद कारवाईत वर नमुद तिन्ही दुकानदारांकडुन रू.०२, ५३,२४८/- किंमतीचा गुटखा, पानमसाला इ. प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असुन सदर  आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशनचे  चे पोउपनि शुभम चव्हाण करत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक  अंकीत गोयल, अपर पोलिस अधिक्षक  मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी, लोनावळा विभाग,  सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शुभम चव्हाण, पो.हवा सागर बनसोडे, बंटी कवडे, नापोशि रईस मुलाणी, पोशि आशिष झगडे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!