
घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीचा एक सदस्य पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात,घरफोडीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…
पांढरकवडा शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीतील सदस्याला अटक,घरफोडीचा गुन्हा केला उघड…
पांढरकवडा(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २८/०८/२०२३ रोजी फिर्यादी मारोती रामकृष्ण दुधलकर वय ३२ वर्षे रा. गोकुलनगरी, पांढरकवडा यांनी पोलिस स्टेशन पांढरकवडा येथे तक्रार दिली की, ते घटनेच्या दिवशी घराला कुलुप लावुन त्याचे आईच्या घरी इंदिरानगर येथे गेले व तेथेच रात्री झोपले असता रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी घराचे हॅन्डल लॉक असलेल्या दरवाज्याचे कुलुप तोडुन घराचे आत प्रवेश केला व घरातील
बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर तोडुन त्यात ठेवलेले सोन्याची ६०,०००/- रू किमतीचे दागीने, नगदी ९०००/- रू व घरासमोर उभी ठेवलेली स्विफ्ट डिझाईर कार २,९०,०००/- रू. व ईतर साहीत्य असे एकुण ३४६,३००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला तसेच कॉलनीतील ईतर तिन ठिकाणी चोरीचा करण्याचे प्रयत्न झाले असल्याचे तक्रारीत नमुद केलेले आहे त्या वरून पोलिस स्टेशन, पांढरकवडा येथे अप.क्र. १०३९/२०२३ कलम ४५७,३८०,५११ भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आला होता व पुढील तपास सुरु होता


तसेच अशाच प्रकारच्या घटना पोलिस स्टेशन, वणी, मारेगाव अंतर्गत घडल्याने तेथे देखील गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांच्या आदेशाने पोलिस स्टेशन पांढरकवडा, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, पोलिस स्टेशन वणी, मारेगाव यांचे पोलिस स्टेशन स्थरावर पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणनेकरीता पथकास सुचना देण्यात आले असता त्या अनुषंगाने नमुद
पथकांनी तसेच पोलिस स्टेशन,पांढरकवडा यांचे पथकाने मिळालेल्या तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्हयाचे अनुषंगाने
वाशिम, चंद्रपुर, वरोरा येथे जावुन गुन्हयासंबंधाने माहिती घेतली असता आरोपी हे परराज्यातील असल्याची माहिती मिळाली परंतु सदर आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसतांना नमुद पथकांनी मिळालेल्या तांत्रीक माहितीचे विश्लेषण करून इतर राज्यातील गुन्हे अभिलेखावरील माहितीचे अवलोकन केले असता जिल्हा
आसीफाबाद राज्य तेलंगाना येथे अटक असलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा सहभाग पांढरकवडा येथे घडलेल्या घटनेत असल्याचे दिसुन आल्याने गुन्हयातील आरोपी शेट्टी रमेश उर्फ प्रकाश राजमनीकम वय ५४ वर्षे रा. प्रदुर गाव वलीपुरपम जिल्हा पल्लवरम रेल्वे प्लॅटफॉर्म, चेन्नई राज्य तामिलनाडु यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने कौशल्यपुर्वक सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचे ईतर साथीदारासह पांढरकवडा, वणी व मारेगाव येथे गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्हयात चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कारचा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शोध घेवुन फिर्यादीस परत करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील ईतर
आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांचा शोध घेणे करीता पोलिस निरीक्षक अमोल माळवे पोलिस स्टेशन,पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन स्थरावर पथक तयार करण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलिस अधीकारी रामेश्वर वेंजने , पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक आशिष गजभीये, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलिस स्टाफ प्रमोद जुनुनकर, मारोती पाटील, सचिन काकडे, अंकुश बहाळे, राजु बेलयवार,
राजु मुत्यालवार, छंदक मनवर, सुर्यकांत गिते, निलेश पेंदोर यांनी पार पाडली



