ॲानलाईन फसवणुकीत अडकलेले पैसे मिळवून देण्यास नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांना यश….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ऑनलाईन फसवणुकीची रक्कम तक्रारदारास परत करण्यास नागपुर ग्रामीण सायबर पोलिस स्टेशनला मिळाले यश…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार नामे राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्रामवर पार्टटाईम जॉबची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता यातील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला टास्क दिले. सदर टास्क पुर्ण झाल्यावर त्या बदल्यात तुम्हाला पैसे
देण्यात येतील असे सांगुन तक्रारदारला काही रक्कम गुंतवणुक करण्यास सांगीतले तक्रारदारने त्यावर विश्वास ठेवुन रक्कम गुंतवत गेला. असे करत १,२०,००० /- रूपयाची गुंतवणुक केल्यावर तक्रारदाराचे लक्षात आले की, आपल्या सोबत फसवणुक होत आहे.





या नंतर तक्रारदाराने NCCRP Portal वर ऑनलाईन तक्रार केली.
सदर तक्रार सायबर पोलिस स्टेशन नागपूर ग्रामीण येथे प्राप्त होताच तपासाची सुत्र हलवुन सदर तक्रारदारचे पैसे कोणकोणत्या खात्यावर ट्रान्सपर झाले याची माहिती तात्काळ घेण्यात आली. व सायबर फ्रॉड मधील आरोपी पैसे लवकर विड्रॉल करतात याची माहिती असल्यामुळे ज्या खात्यावर पैसे ट्रान्सपर झाले आहे ते सर्व अकांउट डेबिट फिज केले. त्यामुळे तक्रारदाराचे पैसे आरोपीच्या खात्यामध्ये होल्ड झाले. त्यांनतर तक्रारदारला बोलवुन कोर्टा मध्ये सदर रक्कम परत घेण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून मा. कोर्ट नागपूर येथे पैसे परत घेणे करीता सुपूर्दनामा दाखल केला.
मा. कोर्टाने कार्यवाही पूर्ण करून दिनांक ०३/०१/२०२४ रोजी तक्रारदारचे फसवणुक झालेली रक्कम परत करण्याचे आदेश पारित केले. यांमुळे तक्रारदाराने सायबर पोलिस स्टेशन व मा. न्यायालयाचे आभार मानले.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस  निरीक्षक राजेन्द्र निकम, पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, महिला पोलिस हवालदार स्नेहलता ढवळे, वर्षा खंडाईत, नायक पोलीस शिपाई सतीष राठोड, संगीता गावंडे, ममता सरोदे, पोलिस शिपाई मृणाल राऊत, मनीष नेवारे यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!