कुख्यात गुंड जब्बा MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 कुख्यात गुन्हेगार जब्बा वानखेडे याला एम.पी.डी.ए.अंतर्गत केले स्थानबध्द…

यवतमाळ (प्रतिनिधी)- अवधुतवाडी पोलिसांनी गंभीर गुन्हे करणारा अट्टल आरोपी वृषभ ऊर्फ ऋुषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे) रा.रामकृष्णनगर, मुलकी, यवतमाळ याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम नामे वृषभ ऊर्फ ऋषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे), रा.रामकृष्णनगर, मुलकी, यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख सन २०१८ पासुन असल्याने व त्याच्या विरुध्द घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, संपत्तीचे नुकसान करणे, जबरी चोरी, शिवीगाळ करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, जखमी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे अवधुतवाडी पोलीस ठाण्यात नोंद असल्यामुळे व त्याने यवतमाळ शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले असल्यामुळे त्याच्यावर दाखल गुन्ह्याची कागदपत्रे पडताळणी करून ठाणेदार पो.स्टे. अवधुतवाडी यांनी त्यास एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी मंजुरी देऊन (दि.११जानेवारी) रोजी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले. त्यावरुन त्याचा पोलीस स्टेशन अवधुतवाडीचे पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले असुन त्यास अकोला जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.



अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही डॉ.पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, यांच्या मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. अवधुतवाडी, सपोनि प्रताप भोसले, पो.स्टे. अवधुतवाडी, तसेच पोउपनि धनराज हाके, स्था.गु.शा. यवतमाळ, पोलीस अमंलदार प्रतिक नेवार पो.स्टे. अवधुतवाडी, व बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट, स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!