अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरीत्या मोहाफुलाची गावठी दारू काढणार्यावर कुही पोलिसांचा  छापा….
कुही(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षकांचे आदेशानुसार अवैध धंदे यावर अंकुश बसावा म्हनुन पोलिस अधिक्षकाचे विशेष पथक हे दि. १७/०१/२०२४ चे ५.३० वा. दरम्यान विशेष पोलिस पथक नागपुर ग्रामीण हे अवैध धंद्यावर रेड
करण्याकरीता पोस्टे कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली की, मौजा नाग नदी दातपाडी शिवारात असलेल्या नाल्यालगत विजय मांढरे, रा. कुही हा मोहाफुल सडव्याची साठवणुक करून मोहाफूल दारू काढतो अशा मिळालेल्या माहितीवरून मिळालेल्या माहितीची शाहानीशा करून मौजा नाग नदी दातपाडी शिवारातील पानंद नाला येथे रेड केली असता नाल्यालगत झुडपामध्ये मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारा आरोपी नामे – विजय हरीभाउ मांढरे, वय ५५ वर्ष, रा. कुही ता. जि. नागपूर हा मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आला. त्याचे ताब्यातुन प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे अंदाजे ८०० लीटर मोहाफुल रसायन सडवा भरलेले प्रति लीटर २०/- रू. प्रमाणे किंमती १६,००० / – रू., इतर साहित्य किंमती ५६८० /- रू. असा एकुण २१,६८० /-
रूपयाचा मुददेमाल मिळून आल्याने नष्ट करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो.स्टे कुही येथे कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार  तसेच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले  यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास ठमके, पोलिस हवालदार हरीदास चाचरकर, ओमप्रकाश रेहपाडे, पोलिस अंमलदार अनिल करडखेले, अतुल बांते व गोरख निंबार्ते यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!