
बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ, अन् केला व्हायरल कारण…
बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ अन् केला व्हायरल कारण…
पुणे – प्रेमसंबंध असताना प्रेयसीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला. ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करुन व्हिडिओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केली. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग करणाऱ्या अहमदनगर येथील तरुणावर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 17 जानेवारी 2024 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास धनकवडी येथे घडला आहे.


याबाबत बालाजीनगर धनकवडी येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.18) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जुनेद शकील मोमीन (वय 21 वर्षे रा.मु.पो. साकुर, जि. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी तरुणी आणि आरोपी जुनेद मोमीन यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना आंघोळ करताना व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. आरोपीने फिर्यादी यांचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रोकॉर्डींग करुन घेतला. यानंतर तरुणीने आरोपीसोबत असलेले संबंध तोडले. ब्रेकअप झाल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून त्याने इंन्स्टाग्रावर तरुणीच्या नावाने फेक अकाउंट तयार केले. यानंतर तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर अपलोड करुन व्हायरल करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी जुनेद याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने करीत आहेत.



