
अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये
एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…..
अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा तो कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधिक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा
प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात कुख्यात
गुंडाविरूध्द एमपीडीए कायदया अंर्तगत स्थानबध्द आदेश पारीत केले मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २४/०१/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर उपविभाग, अकोला, सुभाष दुधगांवकर, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके,पोहवा ज्ञानेश्वर सैरीसे, पोशि उदय शुक्ला यांनी तसेच पोलिस स्टेशन . डाबकी रोड, अकोला येथील पोलिस निरीक्षक
किशोर जुनघरे, पोशि. उमेश पाटील, सुगंधी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती येणा-या निवडणुका तसेच आगामी काळात सन-उत्सवाचे अनुषंगाने संकलीत करण्यात
आली असुन काही गुन्हेगांराविरुद्ध एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावित आहे.




