बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी…

बीड (प्रतिनिधी)- तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात
निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.





पाच लाखांच्या मावेजासाठी उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरवदे याच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २५ जानेवारी रोजी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.



विशेष म्हणजे सागरे यांनीच वसुलीसाठी नेमलेला सेवानिवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा. अंबाजोगाई) याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भारती सागरे यांना पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, दुसऱ्या दिवशी न्यायालयात उभे केले असता २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, प्र. अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, सहायक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली होती.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!