गोमांसाची तस्करी करणारे यांचेवर शिवुर पोलिसांची धडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बोलेरो पिकव्हॅन मध्ये अवैधरित्या चोरट्या मार्गाने जाणारे 900 किलो गोमासं शिवुर पोलीसांनी पकडले. 1 आरोपीसह 8,80,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त …..

वैजापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
जिल्हयामध्ये चोरटया मार्गाने गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची मासांची विक्री करणारे तसेच त्यांना क्रूरपणे वागणुक देवुन त्यांची दाटीवाटीने वाहतुक करणा-यावर सक्त व धडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिले होते





या अनुषंगाने दिनांक २४/०७/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास शिवुर पोलिस ठाणे येथे पोहवा राहुल रंगनाथ थोरात  हे ठाणे अंमलदार म्हणुन कर्तव्य करत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वैजापुर येथुन एक पिक व्हॅनमध्ये गोवंशीय जातीची जनावरे कापुन त्याचे मासं हे वैजापुर ते शिवुर बंगला रोडने जाणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदर माहिती ही सपोनि भरत मोरे यांना दिली.
यावरून सपोनि भरत मोरे व त्यांचे पथकाने शिऊर बंगला रोडवरील पोलिस स्टेशन फाटा येथे सापळा लावला असता संशयीत वाहन हे भरधाव वेगात वैजापुर कडुन येतांना पथकाचे निदर्शनास पडले यावेळी सपोनि भरत मोरे व पथकाने बॅरिकेटस आडवे लावुन सदर वाहनचालकास वाहन थांबविण्याचा ईशारा दिला.



वाहनचालकाने त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एमएच ४६ ई ४७०९ ही रोडच्या बाजुला घेवून सुरक्षितपणे थांबविले व  यावेळी वाहनचालकास  त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव अन्सार रौफ शेख वय २३ वर्षे रा. खंडाळा ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर असे सांगितले. त्याला पिकमध्ये पाठमागील बाजुस असलेल्या
काळया रंगाचे ताडपत्रीमध्ये काय आहे. याबाबत विचारपुस केली असता  त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासत घेवुन विचारपुस करता त्यांने ताडपत्रीच्या आतमध्ये गोमासं असल्याचे सांगितले. यावर पथकाने ताडपत्रीची पाहणी केली असता त्यामध्ये जवळपास 900 किलो गोवंश जातीच्या जनावराचे गोमांसाची चोरटी वाहतुक व  विक्री करण्याचे उद्देशाने मासं लपवलेले मिळुन आल्याने बोलेरो वाहन व मास असा एकूण 8,80,000/- रुपयांचा मुद्देमाल शिवुर पोलिसांनी जप्त केला आहे.



यातील आरोपी अन्सार रौफ शेख वय 23 वर्षे रा. खंडाळा ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर यास ताब्यात घेवून त्याचे विरुद्ध पोलिस ठाणे शिवुर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 व सह कलम 5 (ब) (क), 9(अ) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवुर पोलिस करित आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,अपर पोलिस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी महक स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भरत मोरे ठाणेदार पोलिस स्टेशन शिवुर,पोलिस अंमलदार राहुल थोरात, आकाश बोरकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!