
दुचाकी शोरुमधे चोरी करणारा सराईत गुन्हेगार LCB च्या ताब्यात….
वावी गावातील मोटर सायकलचे शोरूम फोडणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात…
.https://www.instagram.com/reel/DDZmBsAoAP3/?igsh=MThicmNuaDI2OWtrag==


नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळ पाडव्याच्या दिवशी सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावचे शिवारात कोणीतरी अज्ञात चोरटयांनी भारत अॅटोमोबाईल नावाचे हिरो कंपनीचे मोटर सायकलचे शोरूम दुकानाचे बंद शटरचे कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करून ०३ नवीन होंडा स्प्लेंडर मोटर सायकल व एक्साईड कंपनीच्या बॅट-या असा एकुण २,३५,१७८/- रू. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदर बाबत वावी पोलिस ठाणे येथे गुरनं ४४०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हयातील नाउघड गुन्हयांचा समांतर तपास करीत होते त्यानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरील गुन्हयाचे समांतर तपासात आरोपींचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरून गोपनीय माहिती घेतली असता, यातील आरोपी प्रदिप संजय रॉय यास निषपन्न करुन तो सिन्नर शहरात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथकाने सिन्नर शहरातील शंकरनगर परिसरात सापळा रचुन सराईत गुन्हेगार प्रदिप संजय रॉय, वय २४, रा. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, शंकरनगर, सिन्नर, ता. सिन्नर यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्याने गत महिन्यात सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावचे शिवारात एक मोटर सायकलचे शोरूम फोडून मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपी प्रदिप संजय रॉय यास वावी पोलिस ठाणे कडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर आरोपीचे ताब्यातुन वरील गुन्हयात चोरून नेलेल्या ०३ नवीन हिरो स्प्लेंडर मोटर सायकल किं. रू. २,३०,१७८/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपी प्रदिप रॉय हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्याचेविरूध्द विविध पोलिस स्टेशनला खालील गुन्हे नोंद आहेत १) MIDC सिन्नर पो.स्टे. गुरनं २८८/२०२३ भादवि कलम ३८०,४५७,५११ २) MIDC सिन्नर पो.स्टे. गुरनं २८६/२०२३ भादवि कलम ३९९,४०२
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोलिस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.


