
नुतन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन संबंधितांना दिल्या सुचना,झिरो टॅालरन्स..
नुतन पोलिस अधिक्षकांनी पहीली गुन्हे आढावा बैठक गोवंश तस्करी, महीला सुरक्षा, जिवीत्वाच्या सुरक्षेला विशेष प्राथान्य….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी अकोला पोलिस अधिक्षक म्हनुन पदभार स्विकारताच आज दि २४/०५/२०२५ रोजी अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन सकाळी ११.०० वा पोलिस अधिक्षक कार्यालयातील विजय हॉल करण्यात आले होते.


आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक आढावा घेण्यात आला. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांनी स्वतः बाबतीत ओळख करून देवुन आपल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीबाबत तसेच पो.स्टे. च्या कामकाजाबाबत व ईतर आवश्यक माहिती नुतन पोलिस अधिक्षकांना अवगत करून दिली.

आढावा बैठकी दरम्यान महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, महिला विरूध्द अपराध करण्याऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्या. तसेच अपघातामधील जखमी यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्याकरीता उपाययोजना कराव्यात. युवा वर्गामध्ये नशामुक्ती करण्यासाठी अंमली पदार्थ संबंधाने प्रभावी कार्यवाही करण्यात यावी तसेच अवैध अग्निशस्त्र संबधाने प्रभावी कार्यवाही करण्यात यावी तसेच गोवंश चोरी, गोवंश तस्करी, याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. जिल्हयात सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ प्रभावाने कार्यवाही करण्यात यावी.

त्याचप्रमाणे व्हीजीबल पोलिसींग, नाईट गस्त दरम्यान क्यु आर कोड स्कॅनिंग, सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. मोक्का, कायदया प्रमाणे तसेच तडीपार व जेल मधुन सुटलेले आरोपींवर योग्य प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत सुचना देण्यात आल्या, तसेच वाहतुक नियमांचे उल्लघंन करणा-या वाहनचालकां विरुदध प्रभावी कार्यवाही करण्याबाबत तसेच शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय परिसरातील तंबाखुजन्य पदार्थावर विक्री करणारे विरूद्ध कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.तसेच तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे तात्काळ प्रभावाने निराकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे सायबर गुन्हयाबाबत दखल घेवुन तपास करण्यात यावा अशा सुचना पोलिस अधिक्षक,अर्चित चांडक यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत.
जिल्हयात आगामी सण, उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यस्थेची परिस्थीती संवेदनशिलतेने हाताळुन शांतता सुव्यवस्था अबधित राखावी. सदर आढावा बैठकीकरिता सर्व विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच ठाणेदार तसेच सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.


