तोतया पोलिस अधिकारी म्हनुन फसवनुक करणार्यास अहमदनगर पोलिसांनी केली अटक…
कोतवाली (अहमदनगर)– तोतया पोलिस अधिकारी बनून पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय ३२ वर्ष, रा. चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता. येवला जि. नाशिक, ह.मु.आयटीआय
कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, अहमदनगर) असे आरोपीचे
नाव आहे. याप्रकरणी भगवान गोविंदा बोराडे (वय- ३७ वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.की पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये सचिन प्रशांत पाटील( रा. निफाड जि. नाशिक) याने पोलिस अधिकारी आहे अशी बतावणी करुन फिर्यादीचा भाचा जय राजु सुसरे व चुलत भावजयी सोनाली पंढरीनाथ बोरुडे या दोघांची
नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. वारंवार फोन पे वरून २५ हजार रुपये घेतले होते. तसेच इतर लोकांकडूनही पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणारा नाव बदलून वावरणारा आरोपी सचिन पाटील हा मार्केट यार्डच्या मेन गेटजवळ उभा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तोतया पोलिस अधिकारी नाव बदलून
वावरत होता. तसेच त्याने पोलिसांसारखे दिसणारे गडचिरोली पोलिसांचे ओळखपत्र ही तयार केले होते.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर मोरे करत आहेत. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे.