
दोन तासाचे आत अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात….
दिवसा घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलीसांनी मुद्देमालासह दोन तासाचे.आत केले जेरबंद…..
आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२५ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदार शुभम तुळशीराम वानखडे वय ३० वर्ष रा. मुंडगाव यांनी तक्रार दिली की त्यांचेकडे लग्नसंमारंभाकरीता आलेले पाहुने व त्यांची बहीन दिनांक २३/०४/२०२५ रोजी तिच्या सासरी निघून गेल्याने फिर्यादी व त्यांचे पत्नीने कपाटातील सोने व पैसे चेक केले असता, त्यांना त्यांचे पत्नीचे कपाटात ठेवलेले ११.१३० मिली ग्रॅम सोन्याचे टॉप्स व त्याची चैन असे एकुण १,००,०००/-रू. किंमतीचे तसेच कपाटात ठेवलेले रोख २५,०००/-रू. दिसुन आले नाहीत. सोने व रोख रक्कम फिर्यादींचे घराचे व कपाटाचे कुलुप तोडुन चोरून नेले होते. अशा रिपोर्ट वरुन पोस्टे ला अपराध नं२२२/२५ कलम ३३१(३), ३०५(५), ३५१ (२) बीएनएस प्रमाणे दि.२५/०४/२५ चे ०१.०० वा गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तपासपथक रवाना करण्यात आले होते नमुद पथकाने तपासाची चक्रे जलद फिरवुन गुन्ह्यातील संशईत आरोपी साहील उर्फ गोलु विकास गाडगें वय २३ वर्ष यास निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता अवघ्या दोन तासाचे आत चोरीचा छडा लावुन घटणेसंबंधी उकल करूण आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपूस करुण गुन्हयात चोरी गेलेले ११.१३० मिली ग्रॅम सोन्याचे टॉप्स व नगदी २५०००/रु बाबत आरोपीस विश्वासात घेवुन सदर गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे टॉपस् चैन एकुण १,००,०००/-रू. चा माल हस्तगत करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरिक्षक किशोर जुनघरे, पोउपनि. शिवानंद विर,पोहवा उमेशचंद्र सोळंके,हरिष सोनवणे, शिवकुमार तोमर,पोशि रवि आठवले, उमेश दुतोंडे, गोपाल जाधव, शुभम लुंगे यांनी केली



