कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,८ जनावरांची केली सुटका….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिवरखेड हद्दीत गोवंश जातीचे जनावरांची निर्दयतॆने कोबुन कत्तलीकरीता जाणारे एकुण ०८ गोवंश जातीचे जनावरांची केली सुटका, दोन चारचाकी वाहणासह दोन आरोपींना घेतले ताब्यात, एकुण १२,००,१००/-रू चा मुददेमाल केला जप्त…

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे बाबत सुचना स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना आदेशीत केले होते





त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी सदर गोवंश कार्यवाही करीता पथकाची स्थापना करुन पथकाने गोपणीय बातमीदाराकडुन माहीती घेवुन दि(१०) ॲागस्ट २०२४ रोजी पो स्टे हिवरखेड हद्दीतील शक्ती चौक हिवरखेड येथे नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तली जाणारे दोन चार चाकी मालवाहु वाहन पकडुन त्यामध्ये ०८ गोवंश जातीची जनावरे कींमत २,००,०००/- रू तसेच गोवंश वाहतुकी करीता वारपरण्यात आलेली दोन चार चाकी मालवाहु वाहन कींमत १०,००,०००/- रू असा एकुण १२,००, १००/- मुद्देमाल हस्तगत केला



तसेच यातील आरोपी  १) अब्दल नाजीम अब्दुल नजीर वय ३० वर्ष २) शेख कासीम शेख नजीर वय २२ वर्ष दोन्ही रा. दिवाणझरी, ता. तेल्हारा जि. अकोला यास ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन हिवरखेड येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास कामी पो स्टे हिवरखडे यांचे ताब्यात देण्यात आले तसेच नमुद गोवंश हयांना पुढील संगोपणा करीता गौरक्षण संस्था, दर्यापुर रोड, अकोट ता. अकोट जि. अकोला येथे ठेवण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलिस अधिक्षक  अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलिस निरीक्षक शंकर शेळके,पो.उप.नि. आशिष शिंदे, चालक ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार प्रमोद ढोरे, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, धिरज वानखडे, आकाश मानकर, स्वप्निल चौधरी, अभिषेक पाठक, सतिश पवार, अशोक सोनोने यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!