
बहुचर्चित रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरणाची अकोला LCB ने केली उकल,मुख्य सुत्रधारास घेतले ताब्यात…
सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या ” मिश्रा हमला” प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने केली यशस्वी उकल. हल्याची सुपारी देणारा आरोपी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेतले तर मुख्य सुत्रधार अमित नागदिवे यास नागपुर मधून घेतले ताब्यात,आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची दिली कबुली, दोन्ही आरोपींना ०६ दिवसाची पोलिस कोठडी मंजुर….
*या सर्व प्रकरणावर पोलिसकाका क्राईम बिट न्युज ची होती पुर्ण नजर घटनाक्रम खालीलप्रमाणे*


अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३० ॲागस्ट २०२४ रोजी यातील जखमी रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलिस स्टेशन खदान अकोला येथे तक्रार दिली की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार सायकलवर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करुन आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे खदान अकोला येथे अपराध नं ६२८/२४ कलम १०९, ३ (५) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्ह्याचे तपासात असे निर्द्शनास आले की सदर गुन्ह्यात आरोपीनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. तसेच मोबाईल चा सुध्दा वापर केला नव्हता. स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पथकाने अथक मेहनत करून १५० कि.मी. फुटेज ची तपासणी करून गोपनिय बातमीदार मार्फत हल्ला करणारा मुख्य आरोपी पवन कुंभलकर यास दिनांक १५/९/२४ रोजी अटक केली होती. तेव्हा त्याने इतर साथीदारांसह सुपारी देणारा आरोपी मुश्ताक सिमनानी याचे नाव सांगितले होते. तेव्हा पासुन सुपारी देणारा आणि पवन चे ईतर ०३ साथीदार हे मोबाईल बंद करून फरार झालेले होते.
त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक यांनी आरोपींचे शोधार्थ पोलिस स्थानिक गुन्हे शाखा आणि पो.स्टे खदान चे ०२ पथके तयार केली होते. शेवटी दिनांक १०/०१/२०२५ रोजी फिर्यादी कडून ०३ आरोपीची माहीती देणा-यास ३ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते त्यानुसार.दि १२/१/२५ रोजी नागपुर ग्रामीण LCB चे सपोनि आशिष ठाकुर व त्यांचे पथक त्यांचे तपासात सरणी जि. बैतुल या गावात आरोपी शोधने कामी गेले असता त्यांना अचानक मुश्ताक साबरी/सिमनानी हा मिळूण आला ही माहीती त्यांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना दिली.
लागलीच पोलिस अधिक्षक अकोला यांचे आदेशाने स्थागुशा अकोला, येथील पथक हे रवाना झाले होते. आरोपी मुश्ताक सिमनानी अब्दुल खालीक हाफीज वय ५० वर्ष रा. कब्रस्थान रोड, मोमीन पुरा नागपुर यास नागपुर येथून ताब्यात घेण्यात आले. पुढे स्थागुशा अकोला चे पथकाने गोपनिय माहीती व विचापुस करून साबरी यास सुपारी देणारा सुत्रधार कोन आहे? याची माहीती घेतली असता सुपारी देणारा ईसम अमित गुलाबराव नागदिवे वय ३९ वर्ष व्यवसाय मेडीकल अॅडमीशन ची कन्टलसन्टी, मायनींग, रा. टाटा कॅपीटल हाईट्स मेडीकल चौक नागपूर. हा असुन त्याचे फिर्यादी रामप्रकाश मिश्रा त्याचे सोबत ७० लाखांचा आर्थिक व्यवहार होता. पैसे परत करण्याचे कारणावरून रामप्रकाश मिश्रा यास मारण्याची सुपारी दिल्याबाबत सदर आरोपींनी कबुली दिली आहे. विशेष बाब म्हणजे सुपारी देणारा आज पर्यत फिर्यादी मिश्रा यांचे संपर्कात होता. व हल्ला झाल्यावर देखील मिश्रा यांचे प्रकृतीची विचारपुस करण्यास हॉस्पीटल ला गेला होता. सदर आरोपींना पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, पोलिस शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. . विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, अशोक सोनाने, स्वप्नील खेडकर तसेच चालक प्रशांत कमलाकर, राहुल गायकवाड आणि साबर चे आशिष आमले यांनी केली आहे.


