कुख्यात गुंड गजा कांबळे याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुख्यात व्हाइट कॅालर गुंड गजानन काशिनाथ कांबळे,यास एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…..

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास,जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे, वय ४९ वर्ष, याचे वर यापुर्वी बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, ठकवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून
दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नूकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.





त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड गजानन
काशिनाथ कांबळे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द
करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार
यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक
व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.
२६/०२/२०२४ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून गजानन काशिनाथ कांबळे याचा तात्काळ शोध
घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २७/०२/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. आशिष शिंदे, पोहवा. ज्ञानेश्वर सैरिसे, पोशि उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच
पोलिस स्टेशन बाळापुर येथील सपोनि. पंकज कांबळे व स्टाफ, व पो.स्टे. जुने शहर येथील पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोउपनि, प्रदिप घटे, जुने शहर पोलिस स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे ” असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!