केस खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे यांचे दुकानातील चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

रामदास पेठ(अकोला) – सवीस्तर व्रुत्त असे की  रामदास पेठ, हद्दीतील पी.एच.मार्केटमधील केस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसाईक रामा मुकींदा अभारे यांचे दुकाणातून अज्ञात आरोपीतांनी दुकाण फोडून 100 कि.ग्रॅ. केस अंदाजे रु.2,50,000/- किमतीचे दुकाणाचे शटर वाकवून दुकाणामध्ये प्रवेश करुन चोरुन नेले अशा फिर्यादी रामा मुकींदा अभारे यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे अप.क्र.342/2023 कलम 461, 380 भा.दं.वि. प्रमाणे दि. 29/08/2023 रोजी दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दि.23/10/2023 सदर गुन्ह्याचा तपासामध्ये अमरावती, नागपुर, गोंदीया, चंद्रपुर, वर्धा, भंडारा या परिसरामध्ये गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण केले व गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यामध्ये आरोपी-

1)चंदु हिरा भटकल,





2) दारासिंग हिरा भटकल,



3) वसिम उर्फ सोनु उर्फ नवरेज रफिक
खान व एक विधी संघर्षीत बालकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील आरोपी नामे
वसिम उर्फ सोनु उर्फ नवरेज रफिक खान याचा पोउपनि अविनाश मोहिते सोबत पोहेकॉ  शेख हसन, पोना  तोहिदअली काझी, पोकॉ शाम मोहळे यांनी कौशल्यपुर्वक शोध घेवून यास गुन्हयात अटक केली. आरोपीची पोलीस कस्टडी घेवून त्यास विचारपुस केली असता त्याचेकडून गुन्हयामध्ये चोरुन नेलेल्या केसांच्या मालापैकी 75.440 कि.ग्रॅ. चा रु.1,88,600/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही. संदिप घुगे, पोलिस अधीक्षक, अकोला,  अभय डोंगरे, अपर पोलिस अधीक्षक, ,  सुभाष दुधगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोला,  मनोज बहुरे, पोलिस निरीक्षक, पो.स्टे. रामदास पेठ, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक अविनाश मोहिते सोबत सफौ. सदाशिव सुलकर , सफौ. विजय सावदेकर, पोहेकॉ हसन शेख , पोना-तोहिद अली काझी , पोकॉ-शाम मोहळे, अनिल धनभर  सर्व नेमणुक पो.स्टे. रामदास, अकोला यांनी केलेला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!