अमरावती शहर गुन्हे शाखेने खुनाचा गुन्हा काही तासात केला उघड,आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बडनेरा हद्दीतील येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ३६ तासाचे आत केले जेरबंद…..

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबतचे सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०८/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी गौरव विलासराव पाटील वय २५ रा हनुमान नगर खोलापूरी गेट अमरावती यानी पोलिस स्टेशन बडनेरा येथे तक्रार दिली कि दिनांक ०७/१०/२०२४ रोजी प्रेमराज उर्फ मॉटी गोले याचा अंत्यविधी कार्यकम हिंदू स्मशान भूमी येथे होता सदर कार्याक्रमामध्ये सदर गुन्हातील मृतक अजय विजय वानखडे वय २५ रा खडकाळीपूरा अमरावती व आरोपी  १) आकाश उर्फ अवलाई वसंत चव्हाण २) गणेश उर्फ बंटी शिंदे ३) गणेश शिंदे याचा मित्र हे सुदधा हजर होते





सदर आरोपींनी कोणत्यातरी  कारणावरून मृतक यास गाडीवर  बसवून अंजनगाव बारी रोडवरील मेघे महाविद्यालयाचे शेताजवळ घेवून गेले व तेथे त्याला धारदार शस्त्राने जिवानीशी ठार मारण्यात आले. अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन बडनेरा येथे अपराध क्र ६०२/२०२४ कलम १०३ (५) भा. न्या. स अन्वये नोंद करण्यात आला होता.



सदर गुन्हातील आरोपी आकाश उर्फ अवलाई हा रेकॉर्डवरिल कुख्यात आरोपी असून तो नेहमी स्वताचे राहण्याचे ठिकाण बदलविण्याचे सवईचा असून तो बरेच वेळा सातारा व मुंबई व इतर ठिकाणी मुक्कामाला असतो तसेच घटनेच्या वेळी त्याचे सोबत असलेला आरोपी  गणेश शिदे हा सातारा जिल्हातील मूळ रहिवाशी असल्याची गोपनीय  माहीती बातमीदाराकडून मिळाली होती तसेच गुन्हा घडल्यापासून गुन्हे शाखा युनीट ०१ चे अधिकारी व अंमलदार हे सातत्याने आरोपीबाबत तांत्रिक व गोपनीय माहीती प्राप्त करत असताना दिनांक ०९/१०/२०२४ रोजी दूपारचे वेळेस बातमीदाराकडून माहीती मिळाली कि आरोपी आकाश उर्फ अवलाई हा आपली ओळख लपवून तोडाला रूमाल बांधून हमालपूरा या भागात फिरत आहे.



सदरची माहीती खात्रीशीर असल्याने युनिट ०१ वे अधिकारी व अंमलदार यानी सुध्दा स्वताचा हूलीया बदलवून हमालपूरा भागात सापळा रचून बसले असता आरोपी हा युनीट ०१ चे अधिकारी व अंमलदार याना दिसला असता त्याला ताब्यात घेणार तोच आरोपी हा हमालपूरा येथील अंरूद गल्ली बोळाचा व गर्दीचा फायदा घेवून तेथून पळून गेला. सदर भागातील गल्ली बोळा या अरुंद असल्याने साधारण तास ते दोन तास आरोपी आकाश उर्फ अवलाई हा पोलिसाना हुलकावणी देत होता. पंरतू अखेर गुन्हे शाखा युनीट. ०१ चे अधिकारी व अमलदार यानी त्याला घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले.आरोपी आकाश उर्फ अवलाई याचेकडे प्राथमीक तपास केला असता सदर गुन्ह्याशी १) निखील ठाकरे रा. राजूरा २) सलमान उर्फ तुफान अप्पू खान रा हैदरपूरा अमरावती ३) विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा संबध असल्याचे सांगीतल्याने अधिक तपास कामी मुख्य आरोपी आकाश उर्फ अवलाई याचे व्यतरिक्त दोन इसम व एक विधीसंघर्षग्रस्त बालक याना सविस्तर चौकशी कामी पो. स्टे बडनेरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. चौकशी अंती पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस स्टेशन बडनेरा हे करत आहे.

सदरची कामगिरी  पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त(मुख्यालय) कल्पना बारवकार ,पोलिस उपआयुक्त परीमंडळ १ सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त कैलास पुडंकर  यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमूख, पोहेका फिरोज खॉन, पोहेकॉ अलीमउददीन खतीब, नाईक पोलीस अमंलदार नाझीमउददीन सैयद, विकास गुडदे, पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहर चालक, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यानी केलेली आहे.

तसेच यातील आरोपी शोधकामी युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार,सपोनि महेश ईंगोले,पोउपनि संजय वानखडे पोहवा दिपक सुंदरकर,गजानन ठेवले,नापोशि संग्राम भोजने,मंगेश शिंदे,नईम बेग,पोशि चेतन कराळे,योगेश पवार,निलेश वंजारी,सागर ठाकरे,राजीक रायलीवाले यांनी सहकार्य केले





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!