
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ चा जुगारावर छापा,जुगारींसह मुद्देमाल हस्तगत….
गुन्हे शाखा, युनिट ०१ चा पोलिस स्टेशन. नागपूरीगेट हद्दीत जुगारावर छापा, ६ जुगारींसह व एकूण ४९, ९४०/-रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्विकारताच झिरो टॅालरन्स चा पवित्रा घेत शहर हद्दीतील अवैध धंदे करणार्या गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडलय आणि ह्याच प्रकारे कार्यवाही करत राहण्याचे स्पष्ट संकेत सर्व प्रभारींना तसेच गुन्हे शाखेला देण्यात आले आहे


त्याअनुषंगाने दिनांक १८/०६/२०२५ रोजी वरीष्ठांचे आदेशाने गुन्हे शाखा युनीच ०१ चे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंदयांवर छापा तसेच तडीपार, निगराणी बदमाश चेक करीत असता पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारा कडून माहिती काढली असता पो.स्टे. नागपूरीगेट हद्दीमध्ये अकबर नगर येथे पुलाचे जवळ एका टिनाचे शेडमध्ये काही ईसम ५२ पत्त्यांचा, पैशाचे हार-जीतचा खेळ खेळत आहेत अशी माहिती प्राप्त झाली

सदरची माहिती खात्रीशीर असल्याने गुन्हे शाखा, युनिट १, चे अधिकारी व कर्मचारी यांनी लगेच नमुद ठिकाणी जावून छापा कार्यवाही केली असता त्याठिकाणी ६ ईसम एका टिनाचे शेडमध्ये ५२ पत्त्यांचे सहायाने पैशाचे हार-जीतचा खेळ खेळतांना मिळून आले. सदर जुगार खेळल्या जात असलेल्या जागेबाबत विचारणा केली असता सदरची नागा ही जुबेर शहा रउफ शहा, वय २७ वर्षे, रा. गुलजार नगर, अमरावती यांचे मालकीची असल्याचे समजले. सदर जुगार खेळणारे ६ ईसम अनुक्रमे १) जुबेर शहा रउफ शहा, वय २७ वर्षे, रा. गुलजार नगर, अमरावती २) वहीद खान खलिल खान, वय ३२ वर्षे, रा. गुलजार नगर, अमरावती ३) अरशद खान रहेमत खान, वय ३२ वर्षे, रा. अकबर नगर, अमरावती ४) शेख अनवर शेख शमी, वय ३५ वर्षे, रा. अकबर नगर, अमरावती ५) शेख अझर शेख कमरुद्दीन, वय १९ वर्षे, रा. गुलजार नगर, अमरावती ६) साबिर शहा हसन शहा, वय ५५ वर्षे, रा. गुलजार नगर, अमरावती यांना ताब्यात घेऊन तसेच त्यांचे कडून १) नगदी – १३,३९०/-रु. २) २२ पत्त्यांचा कॅट-५०/-रु. ३) ०३ मोबाईल हॅण्डसेट किं. अं.३६,५००/- रू.असा एकूण ४९,९४०/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जप्त मुद्देमाल एकूण किंमत ४९,९४०/-रु.चा पुढील तपासकामी पो.स्टे. नागपूरीगेट यांचे ताब्यात देण्यात आला आहे. पो. स्टे. नागपूरीगेट येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

सदरची कारवाई पोलिस आयुक्त, अरविंद चावरीया, पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकार, पोलिस उपआयुक्त सागर पाटील (परिमंडळ-०१), सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) शिवाजी बचाटे,सहायक पोलिस आयुक्त (गाडगेनगर विभाग) अरुण पाटीलयांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरीष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमूख, पोहवा फिरोज खान, सचिन बहाळे,प्रशांत मोहोड, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, रणजीत गावंडे, सचिन भोयर,पोशि सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक-अशोक खंगार, किशांर खेंगरे, सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट -०१ यांनी यांनी केलेली आहे.


