अवैधरित्या शस्त्र बाळगणारा राजापेठ पोलिसांचे ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राजापेठ( अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की,,राजापेठ पोलिस स्टेशनचे पथक पो स्टे हददीमध्ये स्टॉफसह पेटोलींग करीत असतांना ५.३० वा.  चे सुमारास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदानामध्ये एक  इसम हा स्वतः जवळ देशी बनावटीचा कटटा बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरून पोलिस  स्टॉफ व पंचासह शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदान येथे जावुन पाहणी केली असता एक इसम संशईत रित्या उभा असलेला दिसुन आला. वरून नमुद इसमास पो.स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता  संशईत इसमा कडुन एक देशी गावठी कटटा अग्नीशस्त्र लोखंडी काळया मुठीचे कि अं 20,000 रूपयांचे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे अक्षय संजय चव्हाण, वय 19 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. चवरे नगर, सरकारी संडास जवळ, अमरावती असे सांगीतले. सदरचा कट्टा पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. तसेच नमुद इसमास सदर देशी कटटा कोठुन आणला या बाबत
विचारपुस केली असता त्याने सांगीतले की सदरचा कटटा हा त्याचा परीचीत अजय गणेश वानखडे वय अं 22 वर्षे रा. शिवाजी नगर, अमरावती (फरार) याचे कडुन घेतल्याचे सांगीतले. नमुद इसमाने देशी गावठी कटटा अग्नीशस्त्र विनापरवाना जवळ बाळगुन
पोलिस आयुक्त  यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक पोआअ / विशा / कावसु / 4544 / 2023, पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती दिनांक 05.12.2023 चे आदेशाचे उलंघन केले आहे. नमुद इसमाचे सदरचे कृत्य कलम 3/25 आर्म अॅक्ट सहकलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा होत असल्याने त्याचे विरूध्द सदरचा गुन्हा पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल केला असुन पुढील तपास राजापेठ पोलिस करत आहेत

सदरची कारवाई  नविनचंद्र रेडडी पोलिस आयुक्त अमरावती शहर, सागर पाटील पोलिस उपायुक्त परि- 2, अमरावती, शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली सिमा दाताळकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पो.स्टे.राजापेठ अमरावती, क्राईम पोलिस निरीक्षक पुनीत कुलट, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोहवा मनीष करपे, नापोशि  रवी लीखीतकर,पंकज खटे, गनराज राउत, संजय वानखडे व पोशि सागर भजगवरे यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!