बडनेरा जबरी चोरी प्रकरणातील एका विधिसंघर्षित बालकांसह दोघांना युनीट २ ने केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रात्रीच्यावेळी भर रस्त्यात बळजबरीने लुटून  जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद,एका विधीसंघर्षीत बालकासह २ आरोपींना घेतले ताब्यात….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) ॲागस्ट २०२४ रोजी फिर्यादी रूत्वीक सुभाषराव राणे रा. गणोरी, ता. भातकुली जि. अमरावती यांनी पो. स्टे. बडनेरा येथे तक्रार दिली की, दिनांक २६/०८/२०२४ रोजी ते काम आटपून बडनेरा मार्गाने गणोरी येथे त्यांच्या घरी जात असतांना नेमाणी गोडावून जवळील पुलावजवळ रात्री १.१० वाजता मोबाईलवर गाणे लावण्याकरीता थांबले असतांना साईनगर रोडकडून एका बजाज पल्सर गाडीवर अज्ञात ३ इसम आले व त्यांनी फिर्यादीसोबत धक्काबुक्की करून त्यांच्या मांडीत चाकू मारला व फिर्यादी यांचा मोबाईल तसेच जवळ असलेले ५०० रू जबरीने चोरून नेले.अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन बडनेरा येथे अप. क. ५१९/२०२४ कलम ३५२, ३०९ (९), ३ (५) भा. न्या. स. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आदेशीत केल्यावरून गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दिनांक ०८/०९/२०२४ रोजी गुप्त माहिती वरून सदरचा गुन्ह्यांत १) मयुर किशोर सोळंके, वय १९ वर्ष, रा. चौधरी चौक अमरावती, २) अनील मदन सोळंके, वय २० वर्ष, रा. जयसीयाराम नगर अमरावती, व एक विधीसंघर्षीत बालक यांना निष्पन्न करुन गुप्त माहीती वरून गुन्हे शाखा युनिट. २ च्या पथकाने सापळा रचुन सदर तिन्ही आरोपींना  मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.



त्यांची कसोशीने चौकशी करून त्यांना विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचे ताब्यातून गुन्हयात चोरी गेलेला मोबाईलसह एकूण ३ मोबाईल, गुन्हयात वापरलेला चायना चाकु, तसेच गुन्हयात वापरलेले वाहन असा एकूण १,०५,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. नमुद तिन्ही आरोपींना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. बडनेरा यांच्या ताब्यात देण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त, गणेश शिंदे पोलिस उपायुक्त सागर पाटील,सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे नेतृत्वात सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोहवा गजानन देवले, दिपक सुंदरकर, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, पोशि चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले पोहवा संदीप खंडारे, चेतन शर्मा यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!