सराईत चारचाकी वाहन चोरटा LCB च्या ताब्यात,६ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चारचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ६ चारचाकी चोरीचे गुन्हे केले उघड,त्याचे साथीदारांनाही घेतले ताब्यात…..

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांनी दि ०३ डिसेंबर २०२४ रोजी पो.स्टे. तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की, त्यांचे मालकीची टाटा कंपनीची इंडोगो ई.सी. हे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ४० के. आर. ९७५० कि.अं. १,००,०००/- रु ही त्यांचे घरासमोर उभी असतांना दि.०२ डिसेंबर २०२४ चे रात्रीदरम्यान अज्ञात चोरटयाने सदर चारचाकी वाहन चोरुन नेले. अशा सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांचे तोंडी तक्रारीवरुन  पोलिस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप.क. ३८९/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचप्रमाणे  अशाच प्रकारचा गुन्हा पोलिस स्टेशन लोणी हद्दीत घडल्याने तेथेसुध्दा अज्ञाताविराधात अप.क्र. ३२३/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा करण्यात आला होता





सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी चारचाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटणांना आळा घालून सदर टोळीस जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखेडे यांना आदेशीत करुन कठोर कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदूर रेल्वे उपविभागातील पोउपनि मो. तस्लीम व दर्यापूर उपविभागातील पोउपनि. नितीन इंगोले यांचे पथक चारचाकी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदरचे गुन्हे हे प्रफुल गजानन गांगेकर रा. देवळी जि. वर्धा हा करत असुन तो यवतमाळ येथील भारत नगरी येथे त्याचे कुटूंबासह मागील काही महिण्यापासून भाडयाने राहत आहे. परंतु तो सध्या पुलगाव जि. वर्धा येथे गेला असल्याची खबर मिळाल्याने पथकाने ग्राम नाचनगाव चौफुली, पुलगाव येथुन प्रफुल गजानन गांगेकर वय ३५ वर्ष, रा. यवतमाळ याला ताब्यात घेतले



सदर आरोपी १) प्रफुल गजानन गांगेकर वय ३५ वर्ष, रा. यवतमाळ यास चारचाकी चोरीचे गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने अमरावती ग्रामीण घटकातील १) पो.स्टे. तळेगाव दशासर हहोतील ग्राम घुईखेड, २) पो.स्टे. लोणी हहीतील ग्राम लोणी येथून चारचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर येथून २ चारचाकी व पो.स्टे. अवधूतवाडी जि. यवतमाळ हद्दीतुन २ चारचाकी अशा एकूण ६. चारचाकी गाडया चोरी केल्या असल्याची कबुली देवून पो.स्टे. लळेगाव व पो.स्टे. लोणी हद्दीतून चोरी केलेल्या इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ व इंडोगों ई.सी. क्रमांक एम. एच. ४० के. आर. ९७५० हया दोन्ही गाड्या २) सेफुद्दीन इजाजुद्दीन खान रा. आझाद नगर, नई बस्ती टेका, नागपुर यास विक्री केल्याचे सांगीतले, बरुन सैफुद्दीन पास ताब्यात घेवून विचारपुस करुन त्याचे ताब्यातून एक इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ जप्ती पत्रकाप्रमाणे ताब्यात घेतली व इंडोगो ई.सी. क्रमांक एम.एच.४० के. आर. ९७५० ह्या गाडीबाबत सैफुद्दीन यास
विचारले असता नागपुर येथील भंगार व्यापारी ३) मो. एहतेशाम उर्फ अनु मो. ईरफान रा. मोमीनपुरा, नागपुर याला स्कॅप करीता विक्री केल्याचे सांगीतले. यावरुन भंगार व्यापारी मो. एहतेशाम याचे ताब्यातुन नमुद गाडीचा चेचीस क्रमांक व गाडीचे तुकडे असा एकुण २०,०००/-रु चा माल जप्त केला. तसेच आरोपी कडून चारचाकी चोरीचे नमुद गुन्हे उघडकीस आले आहे.१) पो.स्टे. तळेगाव दशासर अप.क्र. ३८९/२४ क. ३०३(२) भा.न्या.सं.२) पो.स्टे. लोणी अप.क्र. ३२३/२४ क. ३०३(२) भा.न्या.सं. ३) पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर अप.क्र. ५५३/२२ क. ३७९ भादेवी ४) पो.स्टे. बडनेरा जि. अमरावती शहर अप.क्र. ५४४/२२ क. ३७९ भादेवी ५) पो.स्टे. अवधुतवाडी, जि. यवतमाळ अप.क्र. १००३/२२ क. ३७९ भादेवी ६) पो.स्टे. अवधुतवाडी, जि. यवतमाळ अप.क्र. ११९६/२४ क. ३७९ भादेवी



त्याचप्रमाणे नमुद आरोपीचे ताब्यातुन १) इंडीका व्हिस्टा क्रमांक एम.एच. २७ ए.सी. ६०२२ कि.अं. १,५०,०००/-रु २) गाडी चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य कि. अं.५०००/- ३) वेगवेगळया कंपनीचे २ मोबाईल कि. अं. ११,०००/- ४) इंडीगो ई.सी. क्रमांक एम.एच.४० के. आर. ९७५० या स्कंप केलेल्या गाडीचे तुकडे कि.अं. २०,०००/- व गुमहा करण्यासाठी वापरलेली इंडीगो कार क्र.एम.एच.४० ए ८४७० कि.अं. १,५०,०००/- असा एकूण ३,३६,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीकडून एकुण ६ गुन्हयाची उकल करण्यात आलो असून तपासात अधिक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता असून सदर आरोपींना पुढील तपास कामी पो.स्टे. तळेगाव दशासर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक. पंकज कुमावत, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा . किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. नितीन इंगोले, श्रेणी पोउपनि मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, सुनिल महात्मे, निलेश डांगोरे, व पोलीस स्टेशन सायबर चे सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, गुणवंत शिरसाठ चालक अंमलदार संजय प्रधान, हर्षद घुसे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!