चांदुररेल्वे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,जुगारींसह २१ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चांदुर रेल्वे पोलिसांची जुगार अडडयाव छापा टाकुन धडक कार्यवाही,जुगारींसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त…

चांदुर रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशान्वये अवैघ धंदे कार्यवाही करण्यासाठी पोलिस निरीक्षक अजय आकरे  यांचे मार्गदर्शनाखाली दि. १४ जुन २०२५ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथील पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, दिघी कोल्हे शेतशिवारात रायगड प्रकल्प धरणाच्या बाजुला काही इसम एक्का बादशाह नावाचा हारजित जुगार खेळ खेळत आहे





अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे आधारे खाजगी वाहनाने ग्राम दिघी कोल्हे शेतशिवारात लपुन जावुन  रायगड प्रकल्प धरणाच्या बाजुला काही इसम गोलाकार बसुन दिसले. सदर इसम हे एक्का बादशाह नावाचा हारजिचा जुगार खेळ खेळत असल्याची पंचाची व आमची खात्री पटल्याने लागलीचे त्याचेवर छापा टाकला असता जुगार खेळणारे काही इसम आम्हाला पाहुन, पळुन गेले व दोन इसम जागीच मिळुन आले त्याचे ताब्यातुन नगदी ३१००/- रू, तिन मोबाईल कि ३२०००/रू १) एमएच २७ बीव्ही ७२६९ निळया रंगाची मारूती सुझुकी कंपनीची एस कॉस कार कि.७,००,०००/रू. २) एम एच ३२ सी ८११८ सिल्व्हर रंगाची टोयोटो कंपनीची इनोवा गाडी कि.१०,००,०००/रू ३) जिजे ०५ एलजे ६१६६ हिरो स्पेल्डर काळा लाल पटंटा असलेली मोटारसायकल. कि ८०,०००/रू ४) एमएच २७ टी ०७७२ हिरो स्पेल्डर काळा रंगाची असलेली मोटारसायकल कि ५०,०००/रू ५) एमएच ०५ बीएन ५४०१ काळया रंगाची युनिकार्न मोटारसायकल  कि ९०,०००/रू ६) सिल्व्हर रंगाची होंडा शाईन विना कमाकाची मोटारसायकल कि. ८५,०००/रू. ७) एमएच २७ डीएम १६७० काळया व लाल पटयाची होडा शाईन कंपनीची मोटारसायकल कि ८०,०००/रू. असा एकुण २१,२०,१००/रू चा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला.



तसेच यातील आरोपी  १) मंगेश दादाराव रामटेके वय ३६ वर्ष  रा पळसखेड २) राहुल गुरूनाथ मेश्राम वय ४२ वर्ष रा दिघी कोल्हे  ३) सचिन घनश्यामजी लोहीया रा चांदुर रेल्वे  ४) नन्हा देशमुख रा पळसखेड  ५) पंजाब उईके रा नांदगाव खंडेश्वर ६) विक्की सुरेशराव माहुरे रा. पळसखेड ०७) निलेश अंडेवाला रा नांदगाव खंडे अधिक ०३ ते ०४ इसम यांचेवर कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागीस पोलिस अधिकारी अनिल पवार, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस निरीक्षक अजय आकरे, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि नितेश आझडे, श्रेपोउपनि नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, योगेश नेवारे, निलेश रिठे, गजानन वाघमारे, प्रविण मेश्राम, दुर्गेश इंदुरकर, राहुल वानखडे, प्रशांत ढोके, मंगेश गेडाम, प्रदीप पाटील यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!