अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर कुर्हा पोलिसांची धडक कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैद्यरित्या वाळूची वाहतुक करणार्यावर  कुर्हा पोलिसांची मोठी  कार्यवाही,ट्रक व वाळुसह ५१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

कुर्हा(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशानुसार सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याकरीता आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करुन कडक कार्यवाही करा अशा प्राप्त आदेशानुसार दि ०८/०८/२०२५ ते दिनांक ०९/०८/२०२५ रोजी रात्रगस्त दरम्यान पेट्रोलींग करीत असतांना ग्राम मार्डी जवळ कुर्हा पोलिसाना कु-हा कडुन अमरावती कडे जातांना एक ट्रक संशयीत रीत्या दिसला







त्यास थांबवुन ट्रकची पाहणी केली असता. सदर ट्रकमध्ये कन्हान वाळु अं १४ ब्रास आढळून आली. सदर चालकास वाहतुक करण्याचे परवाना बाबत विचारपुस केली असता त्याचेकडे परवाना नसल्याचे त्याने सांगीतले. त्यावरून सदरचा ट्रक टाटा कंपनीचा क्र. एम.एच.४० सिटी ३३३३ अशी १६ चाके असलेला कि अं ५०,००,००० (पन्नास लक्ष रूपये) व कन्हान वाळु १४ ब्रास कि अं १,२०,००० रू असा एकुण ५१,२०,००० रु चा माल जप्त करण्यात आला असुन वाहन चालक सुभाष मामराज चौधरी वय ४० वर्ष रा. पारडी ता. जि. नागपुर व ट्रक मालक रोशन ठाकुर रा. वर्धा यांचे विरूध्द अपराध कमांक ३२७/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस. सहकलम ९,१५ पर्यावरण संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपी चालक यास अटक करण्यात आली असुन आरोपी ट्रक मालकाचा शोध सुरू आहे.



सदर गुन्हयातील आरोपीचे ताब्यातुन एक टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम.एच.४० सिटी ३३३३ अशी १६ चाके असलेला कि अं ५०,००,००० (पन्नास लक्ष रूपये) व कन्हान वाळु १४ ब्रास कि अं १,२०,००० रु असा एकुण ५१,२०,००० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागिय पोलिस अधिकारी मोर्शी . संतोष खांडेकर , प्रभार उपविभाग चांदुर रेल्वे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अनुप वाकडे ठाणेदार पोलिस स्टेशन कु-हा, सफौ दिलीप सावंत, पोहवा उमेश वाघमारे चापोशि सागर निमकर  यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!