डोळ्यात मिर्ची पावडर घालुन लुटणारी टोळी LCB ने केली जेरबंद,अनेक गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

डोळयात मिरची पुड टाकुन लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,लुटीचे अनेक गुन्हे के उघड….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,दिनांक ०५/०४/२०२४ रोजी सांयकाळी ०७:३० वा दरम्यान पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर हददीत निबोरा बोडखा गावाजवळ फिर्यादी शेषराव नथ्थुजी डोंगरे वय ६६ वर्ष रा. निबोरा बोडखा हे मंगरूळ दस्तगीर येथुन त्यांचे गावी निबोरा बोडखा येथे त्यांचे मोपेड वाहनाने जात असता अज्ञात आरोपींनी ट्रिपल सिट येवुन फिर्यादी यांचे वाहनाला मागील बाजुस धक्का देवुन खाली पाडले व फिर्यादी यांचे डोळयात मिरची पुड टाकून चाकुचा धाक दाखवुन नगदी ६०,०००/- रू जबरीने हिस्कावुन नेले अशा फिर्यादी शेषराव डोंगरे रा. निबोरा बोडखा यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर येथे अज्ञात
आरोपीं विरूध्द अप.नं. १५१ / २४ कलम ३९४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक, पंकज कुमावत यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून गुन्हा त्वरीत उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आवश्यक मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. सागर हटवार,नितीन चुलपार यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असता पो.उप.नि. सागर हटवार यांचे पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, शुभम गोपाळे रा. गोकुळसरा ता. धामणगाव रेल्वे,जि. अमरावती हा पुर्वी भारत फायनान्स मध्ये काम करीत होता, त्याची हालचाल सध्या संशयास्पद असुन तो सध्या त्याचे साथीदारासह पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर हददीतील ग्राम विटाळा येथे असल्याची गोपनिय माहीती मिळताच पथकाने ग्राम विटाळा येथे जावुन आरोपी शुभम गोपाळे याचा शोध घेतला असता तो त्याचे तीन साथीदार  १) रितीक रामदास गोपाळे वय २३ वर्ष रा. गोकुळसरा, २) सागर लक्ष्मणराव पचारे वय २३ वर्ष रा. बोरगाव निस्ताने ३) मंगेश सुकलाल ठाकरे वय २८ वर्ष रा. मंगरूळ दस्तगीर यांचेसह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबधाने विचारपुस केली असता त्यांनी
आधी उडवा उडवीचे उत्तरे दिली, त्यांना विश्वासात घेवुन पुन्हा विचारपुस केली असता त्यांनी लुटमार व मोटार सायकल
चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. लुटमारीचे गुन्हे करण्यासाठी प्रथम त्यांनी बाभुळगांव हद्दीतुन दोन मोटार सायकल चोरल्या व दिनांक ०४/०४/२४ रोजी पो.स्टे. तळेगाव शामजीपंत जि. वर्धा हददीत भारत फायनान्सचे कर्मचारी याला टार्गेट करून त्याचे डोळयात मिरची पुड टाकुन १५००००/- रु ने त्याला लुटले व त्याचे दुसरे दिवशी दि ०५/०४/२४ रोजी पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर हददीत फिर्यादी शेषराव डोंगरे रा. निबोरा बोडखा या वृध्द व्यक्तीस टार्गेट करून त्याचे डोळयात मिरची पुड टाकुन चाकुचा धाक दाखवुन ६०,०००/- रू ने लुटले असल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपीकडुन ताब्यात घेवुन त्यांचे कडुन १) पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर अप.नं. १५१/२४ कलम ३९४ भादवि २) पो.स्टे. तळेगाव शामजीपंत जि. वर्धा अप.नं. २८०/२४ कलम ३९४ भादवि ३) पो.स्टे. बाभुळगाव, जि. यवतमाळ अप.नं. २९२ / २४ कलम ३७९ भादवि, ४) पो.स्टे. बाभुळगाव, जि. यवतमाळ अप.नं. २९८/२४ कलम ३७९ भादवि, ५) पो.स्टे. आर्णी, जि. यवतमाळ अप.नं. २९७/२४ कलम ३७९ भादवि असे ५ गुन्हे उघडकीस आले असुन त्यांचे कडुन ०३ मोटार
सायकल आणि ४ मोबाईल असा एकुण २,६०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.





नमुद आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रा., पंकज कुमावत  यांचे मार्गदर्शनात  किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार,नितीन चुलपार, श्रे.पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर, पोलिस अमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, भुषण पेठे, रविंद्र बावणे, सचिन मसांगे, पंकज फाटे तसेच पो.स्टे. सायबर येथील अंमलदार सागर धापड, चेतन गुन्हाने, रितेश वानखडे, सारीका चौधरी, चालक अंमलदार संजय प्रधान, निलेश येते यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!