
गांजाची अवैध वाहतुक करणारे गुन्हे शाखेने केले जेरबंद…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव खंडेश्वर परीसरात पकडला २१ किलो गांजा,एक विधीसंघर्षित बालकांसह एकास मुद्देमालासह घेतले ताब्यात…
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.(०८) जुलै २०२४ रोजी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्यीत गस्त करीत असतांना खात्रीशिर माहीती मिळाली की, दोन ईसम नांदगाव खंडेश्वर ते यवतमाळ रोडवरील समृध्दी महामार्गाचे पुलाखाली संशयास्पदरीत्या फिरत आहेत.अशा मिळालेल्या माहीती वरुन पोलिस पथकाने नमुद ठिकाणी सापळा रचुन संशयीत ईसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्याची नावे १) साहील शहा अख्तर शहा, वय २२ वर्ष रा. हैदरपुरा, अमरावती २) विधीसंघर्षात बालक असे सांगीतले.


त्यांना त्यांच्या फिरण्याचा उद्देश विचारला असता उडवा उडवीचे उत्तरे दिली म्हणुन त्यांचे ताब्यातील कॉलेज बॅग व थैली ची तपासणी केली असता त्यामध्ये १० पिवळया रंगाचे खाकी सेलो टेपचे आवरण असलेले ठोकळे मिळुन आले. त्याबाबत अधिक विचारपुस केली असता सदर ठोकळे हे गांजा चे असल्याचे व ते विक्री करीता घेवुन जात असल्याबाबत आरोपींनी सांगीतले.

पोलिस पथकाने सदर माल हा गांजा असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर त्वरीत पोलिस निरीक्षक नांदगाव खंडेश्वर सुनील सोळंके यांनी बोलावुन अवैध अंमली पदार्थ गांजा बाळगल्या मुळे रितसर कारवाई करण्यात आली असुन आरोपीच्या ताब्यातुन २१ कि.ग्रॅ. गांजा, दोन मोबाईल असा एकुण ३,४८,६७५/ – रु चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द अंमली पदार्थ प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींनी सदरचा गांजा विशाखपट्टणम येथुन आणला असुन अमरावती येथे घेवुन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच सखोल चौकशी केली असता सदरचा गांजा हा नागपुरी गेट येथे राहणारी महीला फरीदा बी हिच्या सांगण्यावरून आणल्याचे आरोपींनी कबुल केले त्याप्रमाणे पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलिस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक. विशाल आनंद(भापोसे)अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, (भा.पो.से.)सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,चांदुर रेल्चे आशित कांबळे, (भा.पो.से.)यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे,पोलिस निरीक्षक सुनील सोळंखे ठाणेदार पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांचे नेतृत्वात पो.उप.नि. नितीन चुलपार पोलिस अंमलदार अमोल देशमुख, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, रविन्द्र बावणे, पंकज फाटे, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.


