संशईत आरोपींना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

संशयावरुन ईसमांना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा… 

परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – जिल्ह्यात सतत होणार्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामिण विशाल आनंद यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोडीचे गुन्हयाना आळा बसावा याकरिता विशेष सुचना दिल्या होत्या





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यानुसार फिर्यादी प्रवीण कृष्णकुमार अग्रवाल वय ३८ वर्ष, रा. नाईक प्लॉट कांडली ता. अचलपुर ह.मु. PWD ऑफीस समोर परतवाडा यांनी दिनांक १३/०६/२०२५ रोजी तोंडी तक्रार दिली की, दिनांक ०२/०६/२०२५ चे १०/०० वा. ते दिनांक १२/०६/२०२५ चे ६/०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून सोने, चांदी व नगदी असा एकुन ७,४७,७०० रूपयाचा मु‌द्देमाल चोरी केलेला आहे. अश्या फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशनला अपराध क्रमांक ४३६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद आहे.



सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल शोध कामी पोलिस स्टेशन परतवाडा डि बी पथकास रवाना करुन ते माहीती घेत असता गुप्त बातमीदारा कडुन विश्वसनीस माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन रेकॉडवरील गुन्हेगार अक्षय मोहन उईके रा. कालीमाता नगर परतवाडा याचे जवळ सोन्याचे दागीने आहे व तो फॉरेस्ट डेपो परीसरात फिरत आहे. अशा माहीतीवरून आरोपी अक्षय मोहन उड्‌के वय २७ वर्ष रा. कालीमाता नगर टीबर डेपो परतवाडा ता. अचलपुर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिश्यात लहान मुलांच्या ०६ पिवळ्या धातुच्या अंगठ्या मिळुन आल्या. त्यास सदर दागीने बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन पुन्हा विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याने संजय उर्फ मुन्ना कदळे रा. जुनी वस्ती कांडली परतवाडा याचे सोबत दिनांक ०३/०६/२०२५ चे रात्री अंदाजे ०३/०० वाजताचे सुमारास नाईक प्लाट कांडली येथील एका बंद घरातुन सदरचे दागीने चोरले आहे. त्याने दिलेल्या चोरीचे माहीती वरून आम्ही गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याने सांगीतले घटानास्थळ व कालावधी लक्षात घेवुन पडताळणी केली असता पोलिस स्टेशन परतवाडा येथे अपराध क्रमांक ४३६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद असुन अक्षय उड्के व मुन्ना उर्फ संजय कवडे याने सदर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.



सदर गुन्हयात आरोपी अक्षय मोहन उईके, वय २९ वर्ष व विजय बाहुराव वानखडे, वय ३० वर्ष दोन्ही रा. कालीमाता झोपडपटटी परतवाडा यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपी संजय उर्फ मुन्ना कवळे रा. जुनी वस्ती कांडली परतवाडा हा सध्या फरार आहे.सदर गुन्हयासंबधाने पोलिस स्टेशन परतवाडा डि बी पथकाने आरोपीचा शोध घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरी गेलेले सोन्याचे व चांदीचे दागीने एकुन किंमत अंदाजे ६,३७,७०० रूपये तसेच नगदि ५०,००० रूपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकलम क्रमांक TVS STAR CITY कंपनीची MH 27 AB 1035 क्रमांकाची मोटर सायकल कि. ३०,००० रूपयाची असा एकुन सोने, चांदी व नगदी असा एकुन ७,१७,७०० रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. प्रशोत जाधव, पोहवा सचिन होले, पोशि विवेक ठाकरे, शुभम शर्मा जितेश बाबील, योगेश बोदुले, पोशि सचिन कोकणे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!