
पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद….
पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन लुटणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,आरोपीसह मुद्देमाल हस्तगत…
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन परतवाडा येथे दि ०२ जुन २०२५ सुधाकर नामदेव राउत वय ४४ वर्ष, रा. सुपलवाडा ता. चांदुर रेल्वे तक्रार दिली की, काही दिवसांपुर्वी त्यांचे गावातील सचिन बालबस ठाकरे याने त्यांना येवुन सांगितले कि, तो दिलीप राउत रा. अचलपुर नावाचे व्यक्तीस ओळखतो आणी तो पुजा करुण पैसे दुप्पट करुण देतो. त्याप्रमाणे फिर्यादी सुधाकर नामदेव राउत याने दिलीप राउत याची भेट घेतली असता दिलीप राउत याने त्यांचे पैसे दुप्पट करुण देतो असे म्हटले. त्याने फिर्यादी यांना सोमवार दि ०२ जुन २०२५ रोजी परतवाडा येथे १० लाख रु घेवुन भेटा तुम्हाला २० लाख करुन देतो असे सांगितले.


त्यानुसार दि.०२ जुन २०२५ रोजी फिर्यादी सुधाकर राउत व त्यांचे गावातील व्यक्ती सचिन ठाकरे असे दोघे त्यांचे मोटर सायकलने अचलपुर येथे आले त्यांचेच मागे फिर्यादी यांचा भाऊ ज्ञानेश्वर राउत हे सुध्दा आले. फिर्यादी यांनी १० लाख रुपये रक्कम जास्त वाटल्याने त्याने त्यातील ३.५ लाख रुपये त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर राउत यास देवुन घरी पाठवुन दिले व व फिर्यादी सुधाकर राऊत व त्याचे मिञ सचिन ठाकरे दोघे त्याचे मोटर सायकलने दिलीप राउत याचे सांगणे वरुण त्रिवेणी संगम मंदिर परीसर परतवाडा येथे ६,५०,०००/- रुपये घेवुन गेले असता तेथे दिलीप राउत याने त्याचे चारचाकी तवेरा गाडीने आलेल्या साथीदारांनी फिर्यादी त्याचे मित्रास मारहाण करुण फिर्यादी जवळील ६,५०,०००/- रुपये रक्कम हिसकावुन घेतली

फिर्यादी सुधाकर राऊत यांना आपल्याला पैसे दुप्पट करण्याचे सांगुन दाखवुन लुटण्यात आले आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी लगेच पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्याद दिली अशा फिर्याद वरुण पोलिस स्टेशन परतवाडा येथे अप क्र.४१८/२५ कलम ३१० (२) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक. विशाल आंनद, अपर पोलिस अधिक्षक पंकजकुमार कुमावत यांनी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन परतवाडा यांना सदर गुन्हा उघडकिस आणने बाबत मार्गदर्शन करुण सुचना दिल्या.

त्याअनुषंगाने सदर गुन्हयातील आरोपी शोध संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान स्थागुशा पथकानी केलेल्या तांत्रिक तपासावरुण व मिळालेल्या गोपनिय खबरेवरुण सदर गुन्हा हा शरद दिगांबर ढोके, रा. शहापुर वरुड नावाचे व्यक्तीने त्याचे साथीदारासह केला आहे. नमुद आरोपीचा कसोशीने शोध घेवुन आरोपी नामे शरद दिगांबर ढोके रा.शहापुर वरुड यास ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन विचापुस केली असता त्याने त्याचे वरील नमुद साथीदार यांचे सह मिळुन सदर गुन्हा केल्याची कबुली देवुन सांगितले कि, त्याने त्याचे वरील साथीदारांसह मिळुन सुधाकर राउत रा. सुपलवाडा यास पैसे दुप्पट करण्याचे सांगुन लुटण्याचा कट रचला व त्यानेच स्वतःला दिलीप राउत रा.अचलपुर असे भासविले होते. व फिर्यादी सुधाकर राउत व त्यांच्या मित्रास परतवाडा ते चांदुरबाजार रोड वरील त्रिवेणी संगम मंदिर परीसरात येण्याचे सांगितले. रक्कम लुटण्यासाठी अमरावती येथुन एक लाल रंगाची तवेरा गाडी क्र MH 27 AC 6397 हि भाडयाने घेतली. फिर्यादी सुधाकर राउत व त्यांचा मित्र सचिन ठाकरे हे परतवाडा येथे रक्कम घेवुन आले असता तेथे त्यांना स्वतःचे मागे येण्यास सांगुन परतवाडा ते चांदुरबाजार रोड वरील त्रिवेणी संगम मंदिर परीसरात नेले. पाठोपाठ तवेरा गाडीमध्ये असलेल्या साथीदारांना बोलावुन फिर्यादी व फिर्यादीचे मित्रास मारहाण करुण पैसे लुटले व पळुन गेलो असे सांगुन सदर गुन्हयाची कबुली दिली.
यावरुण स्थागुशा पथकाने इतर आरोपींचा शोध घेवुन आरोपी क्र २ लाला ऊर्फ मनोजकुमार फुलचंद जयस्वाल वय ४२ वर्ष, रा. फ्रेजरपुरा, अमरावतील३) निलेश देवकरण यादव वय ४० वर्ष, रा. राजापेठ, अमरावती ४) प्रदिप रामराव वैराळे वय ४७ वर्ष, रा.राजना पुर्णा ता. चांदुरबाजार ५) शुभम गोपाल वैराळे वय २६ वर्ष, रा. राजना पुर्णा ता. चांदुरबाजार ६) गोलु ऊर्फ जयकुमार जगदीश गेडाम वय ४० वर्ष, रा. प्रभुध मंडळ फ्रेजरपुरा अमरावती यांना सुध्दा ताब्यात घेतले. व सर्व आरोपींकडुन लुटलेले नगदी ५,१४,००० रुपये तसेच गुन्हयात वापरलेली लाल रंगाची तवेरा गाडी क्र MH 27 AC 6397 कि.अ.४००,००० रुपये व काळया रंगाची होन्डा युनिकार्न कंपणीची मोटर सायकल क्र एम एच २७ डि पी २२५४ कि.अं.१००,००० रु तसेच एकुण ५ मोबाईल कि.अं. ३२,००० रुपये असा एकुण १०,४६,०० रुपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आंनद,अपर पोलिस अधिक्षक, पंकजकुमार कुमावत,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अचलपुर शुभम कुमार सहा. यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात सपोनि सचिन पवार, पोउपनि सागर हटवार, पोउपनि नितीन इंगोले, पोउपनि विष्णु राठोड, पोउपनि तस्लीम शेख व स्थागुशा पोलिस अंमलदार यांनी केली.


