शेतशिवारातुन संत्र्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

शेतातील संञा चोरणा-या टोळीतील फरार सराईत आरोपीस अटक,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,ब्राम्हणवाडा हददीत मागील काही काळात सतत संत्रा चोरीच्या घटना घडत होत्या त्या संबधाने पोलिस स्टेशन,ब्राम्हणवाडा येथे अपराध क्र. ४६१/२३ कलम ३७९ भादवि व अप.क्र. ४६४/२३ कलम ३७९ भादवि चा दाखल असुन सदर गुन्हयातील संत्रा चोरी करणारी टोळीतील काही आरोपीना आधीच अटक करण्यात आले होते. टोळीतील एक सराईत आरोपीसअब्दुल गफुर अब्दुल कादर वय ५३ वर्ष रा.बिस्मील्ला नगर, लालखडी, अमरावती हा सदर गुन्हयात सतत फरार असल्याने त्याचा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा.चे पथक सतत शोध घेत होते.
आज दिनांक १८/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना  गोपनीय खबरीव्दारे माहीती मिळाली कि,संञा चोरी करणारा अब्दुल गफुर अब्दुल कादर वय ५३ वर्ष रा.बिस्मील्ला नगर, लालखडी, अमरावती हा त्याचे पांढ-या रंगाचे झायलो चारचाकी गाडीने परतवाडा शहरात फिरत आहे. अशा गोपनिय खबरेवरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाडा शहरात आरोपीचा शोध घेतला असता आरोपी चिखदरा रोड, परतवाडा येथे त्याचे पांढ-या रंगाचे झायलो कंपनीचे चारचाकी कार क्र. एम एच ४२ बि १४९५ सह उभा असल्याचे दिसुन आल्याने पथकाने तेथे सापळा लावुन त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्दुल गफुर अब्दुल कादर वय ५३ वर्ष रा. बिस्मील्ला नगर, लालखडी, अमरावती असे सांगितले. त्यास ताब्यात घेवून केलेल्या गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्याने आधी दिशाभुल करुण उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने ब्राम्हणवाडा परीसरातील इनामपुर व विश्रोळी भागातील शेतशिवारातुन नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याचे साथीदारासह संञा चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगुन संञा चोरी करण्यासाठी त्याने त्याचे झायलो कंपणीची पांढ-या रंगाची चारचाकी गाडीचा उपयोग केल्याचे सांगितले.यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन महिंद्रा झायलो पांढ-या रंगाची कार क्र. एम एच एम एच ४२ बि १४९५ कि.अं. ५००,०००/रु ची पंचासमक्ष जप्त केली. पुढील कार्यवाही करीता आरोपीस जप्त
मुददेमालासह पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी अब्दुल गफुर अब्दुल कादर वय ५३ वर्ष रा.बिस्मील्ला नगर, लालखडी, अमरावती हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर याआधी सुध्दा
• विविध पोलिस स्टेशनला अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याचे कडुन अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., . विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली  किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वहऱ्हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक मंगेश मानमोडे यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!