काल घडलेल्या दर्यापुर येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणातील आरोपी अमरावती पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की ,दि.०८/१२/२०२३ रोजी दर्यापुर- अमरावती रोड, दर्यापुर येथील रफत पेट्रोलपंप समोर यातील जखमी तीचे आई व नातेवाईकांसह तिचे गावी अंजनगांव येथे जात असतांना त्यांचे गाडीचे पाठीमागुन चारचाकी बी.एम.डब्ल्यु.क्रं.एम.एच ०२ ए.जे.९११६ ने आलेल्या इसमांपैकी एकाने त्याचे वर गोळया झाडल्या. त्यात पिडीत तरूणी तसेच त्याचे परीचयातील श्री गजानन हुरपळे यांना काच लागल्याने ते जखमी झाले. यावरुन पो.स्टे.दर्यापुर येथे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेची माहीती प्राप्त होताच व घटनेचे गांर्भीय बघता घटनास्थळावर  विशाल आनंद पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण.  विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण. गुरुनाथ नायडु उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग दर्यापुर, यांनी तात्काळ भेटी दिल्या होत्या परंतु


सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याने यातील आरोपी तात्काळ अटक करणे गरजेचे असल्याने सदर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करणे बाबत  विशाल आनंद पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. यांनी दिशानिर्देश देवुन किरण वानखडे पोलिस निरीक्षक स्था. गु.शा.अम.ग्रा. संतोष टाले, पोलिस निरीक्षक पो.स्टे. दर्यापुर यांचे नेतृत्वात स्था. गु. शा अम.ग्रा. यांचे चार व पो.स्टे दर्यापुर येथील दोन तपास पथके तयार करुन विविध भागात आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. गुन्हा उघडकीस आणण्या करिता नियोजनबध्द आखणी करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिस पथक घटनेशी निगडीत सर्व विषयांवर तपास करित होते. सर्व तपास पथके प्रत्येक बारीक-सारीक बाबींची इत्यंभुत माहीती संकलीत करित होते. त्याच बरोबर
जखमीचे नातेवाईक यांचेकडुन सुध्दा विचारपुस दरम्यान आवश्यक माहीती प्राप्त करण्यात येत होती. तसेच परिसरातील सर्व सि.सि.टी.व्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यानंतर आरोपींचा शोध घेणेकरीता अकोला,मलकापुर, बाळापुर, खामगाव येथे पथके रवाना झाली होती. मलकापुर येथे गेलेल्या पथकास आरोपी हे कारंजा
परीसरात असल्याची शक्यता असल्याचे समजले. त्यानुसार आरोपीबाबत विचारपुस करून त्यांच्या कारंजा येथील
वास्तव्यासंबंधात स्था. गु. शा.अम.ग्रा. पथकाकडुन अधिक माहीती घेण्यात आली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे
गुन्हयातील आरोपी नामे १) महेश जालमसिंग हरदे २) श्रध्दा हरेल ३) अजय चंद्रकांत पवार सर्व रा मलकापुर
यांना ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन १) बी.एम. डब्ल्यु. क्रं. एम.एच ०२ ए.जे.६११९ २) इनोव्हा क्रं.एम.एच १९ सी.एफ २११ ३) पल्सर दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे.





घटनेची पार्श्वभुमी अशी कि, यातील आरोपी नामे महेश जालमसिंग हरदे व जखमी पिडीत तरूणी यांची सोशल मिडीयावर (इंस्टाग्रामवर) ओळख झाली होती, आरोपी हा बंगलोर मध्ये प्रापर्टी ब्रोकर म्हणनु काम करीत होता व जखमी ही अमरावती येथे शिक्षण घेत होती. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली व आरोपी हा बंगलोर वरून अमरावती येथे वास्तव्यास आला व कठोरा नाका परिसरात घर भाडयाने घेवुन  राहीला होता. आरोपी हा काही दिवसांपूर्वी पिडीत तरूणी हीचे अंजनगाव येथील घरी गेला व पिडीत तरूणी च्या आई-वडीलांना म्हणाला होता कि, ” मी तुमच्या मुलीसोबत लग्न केले आहे तिला माझे सोबत पाठवा. त्यावेळी त्यांनी त्या दोघांच्या विवाह संबंधाचे कागदपत्रे सुध्दा दाखवली होती, परंतु पिडीत तरूणी ने तिचे आईवडीलास ही बाब खोटी असल्याचे सांगुन
विवाहाचे कागदपत्रे बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीत तरूणी चे आई वडीलांनी त्यास त्यांचे घरातुन निघुन जाण्यास सांगीतले. त्यानंतर आरोपी नामे महेश जालमसिंग हरदे याने पिडीत तरुणी व तीच्या आई-वडीलांच्या नावाने पो.स्टे. गाडगे नगर (अमरावती शहर) येथे तक्रार दिल्याने सदर तकारीचे चौकशी करीता दिनांक ०७ / १२ / २०२३ रोजी पिडीत तरूणी ही तिची आई, वडील व परीचयातील गजानन हरपुळे सर्व रा अंजनगाव सुर्जि यांचेसह पो.स्टे. गाडगेनगर ( अमरावती शहर) येथे आली होती. तेथील कामकाज संपल्यानंतर ते अमरावती ते अंजनगाव कडे जाण्याकरीता निघाले असता आरोपींनी दुचाकी व चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करुन दर्यापुर नजीक त्यांचेवर चालत्या वाहनातून गोळया झाडल्या, त्यात पिडीत तरूणी हीच्या मानेला
गोळी लागली तसेच गजानन हरपुळे सुध्दा जखमी झाले. त्यानंतर आरोपी हे १) बी.एम. डब्ल्यु.क्रं.एम.एच ०२ ए.जे.६११९ २) इनोव्हा क्रं.एम.एच १९ सी.एफ २११ ३) पल्सर दुचाकी वाहनाने घटनास्थळावरुन भातकुली मार्गे अमरावती शहर- कारंजा लाड असे पळुन गेले होते. पोलीसांनी त्वरीत सतर्कता दाखवून केलेल्या पाठलागाअंती आरोपी कारंजा लाड येथे स्था. गु.शा.अम.ग्रा. चे पथकास मिळुन आलेले आहे. गुन्हा करतेवेळी आरोपी महेश
जालमसिंग हरदे सोबत १) श्रध्दा हरेल, वय २२ २) अजय चंद्रकांत पवार, वय ४५ सर्व रा मलकापुर व अन्य २ फरार साथीदार सोबत असल्याचे सांगीतले आहे. फरार आरोपी नामे १) आकाश चव्हाण २) पुरूषोत्तम राठोड ३) धनंजय दिधोरकर यांचा कसोशीने शोध घेणे सुरु आहे. आरोपींना पुढील तपासकरीता दर्यापुर पोलिसांच्या
स्वाधीन करण्यात आले असुन पुढील तपास दर्यापुर पोलिस करित आहे.
सदरची कार्यवाही  विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.मा. विक्रम  साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती,  गुरुनाथ नायडु, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पो.नि, स्था.गु.शा., अमरावती ग्रा.,संतोष टाले, पो. नि. दर्यापुर, तसेच स.पो.नि. सचिन पवार, पो.उप.नि. नितीन चुलपार,
संजय शिंदे, सागर हटवार यांचेसह स्था. गु. शा येथील सर्व पोलिस अमंलदार यांचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!