
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई….
आगामी काळात महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या अमरावती जिल्हयातील बहीरम येथील यात्रा सुरू होणार असल्याने सदर यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन,पोलिस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सर्व ठाणेदार अमरावती ग्रामीण जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात येत आहे…..
शिरसगाव(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती जिल्ह्याचे सीमेवरील मध्यप्रदेश राज्यातील परिसरातुन गावठी हातभट्टी दारू निर्मीती व अमरावती ग्रामीण जिल्हयात वाहतुक होत असल्याचे मागील काळात करण्यात आलेल्या अनेक कारवाई वरून निष्पन्न झालेले आहे,यादृष्टीने दि.१९/१२/२०२३ रोजी
पोलिस स्टेशन शिरजगांव,स्थानिक गुन्हे शाखा तसेच मध्यप्रदेश येथील पो.स्टे.भैसदेही येथील संयुक्त पथकाने दोन्ही राज्याचे सीमा परिसरात गावठी दारू विरूध्द विशेष मोहीम राबवुन पो.स्टे.भैसदेही हद्दीत ग्राम खोमई येथील जंगल परिसरात भैसदेही व अमरावती पोलिसांचे संयुक्त पथकाने अवैध गावठी दारू विरूध्द कारवाई केली असता एकुण २० दारुभट्टया नष्ट करण्यात आल्या असुन एकुण १९८ टयुब मध्ये प्रत्येकी ५० किलो प्रमाणे कच्चा मोहा
किं.अं.४,९५,०००/- तसेच २० ड्रम मध्ये मोहा सडवा किं.अं.४८,०००/- असा एकुण ५,४३,०००/- रूचा गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे साहीत्य व मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.


सदरची कार्यवाही .विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण,विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण, अतुलकुमार नवगीरे, उप-विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार (स्था.गु.शा.),सपोनि प्रविण वेरूळकर, महेन्द्र गवई व पो. अंमलदार तसेच म.प्र. येथील पो.स्टे.भैसदही चे प्रभारी अधिकारी श्रीमती अंजना धुर्वे व पो. अंमलदार यांचे संयुक्त पथकाने
केली आहे.



