२४ तासाचे आत अमरावती ग्रामीण पोलिसांनी केला तिवसा येथील खुनाचा उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

तिवसा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२७/११/२०२३ रोजी फिर्यादी

कु. वैष्णवी संजय मांडळे, वय २५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसा





यांनी पोलिस स्टेशन  तिवसा येथे तक्रार दिली की, तिचा भाऊ  वैशाख मांडळे हा आईला किडनी चा आजार असल्याने डायलीसीस करिता दुपारी २.०० वा. चे दरम्यान अमरावती येथे घेवुन गेला होता व ती स्वतः बाहेरगांवी गेली होती. घरी तीचे वडील



 संजय मांडळे, वय ५५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसा



हे एकटेच होते. त्यावेळी कुणीतरी अज्ञाताने घरात येवुन तीचे वडीलांचे डोक्यावर कुठल्यातरी धातक शस्त्राने वार करून जिवे ठार मारले व घरातील सोने, चांदी व नगदी असा एकुण ७४,६८,०००/- रूच मुद्देमाल चोरून नेला. त्याचे  कुटूंबीय दवाखान्यातुन मधुन सायं.०७.०० वा. दरम्यान परत आले त्यावेळी त्यांना घरी संजय मांडळे हे मृत अवस्थेत आढळुन आले त्यावरून त्यांनी लागलीच पोलिस स्टेशन तिवसा गाठुन येथे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनेचे गांभिर्य पाहता विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामिण, सचिन्द्र शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळावर तात्काळ भेटी दिल्या,

विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी तपासाची दिशा निश्चीत करित स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन तिवसा येथील तपास पथकांना दिशानिर्देश दिले व गुन्हा उघडकीस आणण्या नियोजनबध्द आखणी करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलिस घटनेशी निगडीत सर्व विषयांवर तपास करित होते.
सर्व तपास पथक प्रत्येक बारीक-सारीक बाबींची इत्यंभुत माहीती संकलीक करित होते. त्याच बरोबरं मृतकाचे नातेवाईक यांचेकडुन सुध्दा विचारपुस दरम्यान आवश्यक माहीती प्राप्त करण्यात येत होती. तसेच परिसरातील सर्व सि.सि.टी.व्ही कॅमेरे तपासण्यात आले. परिसरातील रहीवाशी तसेच मार्गावरील दुकानदार यांचे पासुन सुध्दा माहीती प्राप्त करण्यात येत होती
घटनेची पार्श्वभुमी अशी होती की, मृतक संजय मांडळे यांचा सराफा व्यवसाय असुन तिवसा येथे मार्केट लाईन मध्ये त्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यात त्यांना दुखापत झाल्याने त्यांनी सराफा दुकानात जाने बंद केले होते. ते घरीच राहत होते व दुकान मुलगा  वैशाख हा सांभाळीत होता. मृतक संजय
मांडळे हे जरी घरी राहत असले तरी ते त्यांचे ओळखीतील नेहमीचे ग्राहक यांचे सोने तारण/ गहाण ठेवणे, गहाण. ठेवलेले सोने सोडणे ईत्यादी सराफा  व्यवहार घरूनच करित होते.

मागील ३-४ महीन्यांपासुन मृतक यांचे घराचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने दररोज त्यांचेकडे ३- ४ राजकाम (गवंडी काम) करणारे मजुर कामावर येत होते. सुरू असलेल्या कामकाजा मुळे सर्व मजुर व मृतक यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे मजुर त्यांचे घरात येणे जाणे करित होते. सदर कामावरील
मिस्त्री  रोशन दिगांबर तांबटकर, वय २५, रा. देऊरवाडा, ता. आर्वी, जि. वर्धा (आरोपी) यांची सुध्दा मृतक यांचे सोबत चांगली ओळख निर्माण झाली होती तसेच त्याची मृतकाचे मुला सोबत सुध्दा मैत्री निर्माण झाली होती, त्यामुळे चर्चे दरम्यान त्याला मृतक हे सोमवारी घरी एकटेच असतात तसेच ते घरून सराफा व्यवसाय करतात
ई:बाबत संपुर्ण माहीती होती. दि. २७ / ११ /२०२३ म्हणजेच सोमवारी मृतकाचे कुटूंबीय हे हॉस्पीटलला गेले आहेत याची त्यांने खात्री केल्यानंतर तो सायंकाळी ०६.०० वा दरम्यान तिवसा येथे दारू प्राशान करून मृतक यांचे घरी येवुन मृतक यास त्याचे झालेल्या मजुरीचे पैश्यापेक्षा अधिक पैश्याची मागणी केली, मृतक याने नकार दिल्याने आरोपी रोशन दिगांबर तांबटकर हा नाराज होवुन घराबाहेर पडला व तेथीलच खालील मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामावरील कुदळीचा दांडा घेवुन परत मृतक याचेकडे वरच्या मजल्यावर आला व मृतकास सोप- सुपारी
खाण्यास मागीतली, मृतक याने सोप- सुपारी दिली व परत पानपुडा ठेवण्या करिता वळला असता आरोपीने दरवाज्याचे बाजुने लपवून ठेवलेल्या कु-हाडींचे दांडयाने मृतकाचे डोक्यावर मागच्या बाजुने जबरदस्त प्रहार केले, त्यात मृतक यांचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर आरोपी याने आतील बेडरूम मधील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागीने घेवुन घटनास्थळावरून त्यांचे मोटार सायकलने निघुन गेला होता. असे आरोपी रोशन याने सांगितले आहे.
गुन्हाच्या समांतर तपासा दरम्यान स्था.गु.शा. अम.ग्रा चे पथकाने आरोपी

रोशन दिगांबर तांबटकर, वय २५ वर्षे, रा. देऊरवाडा, ता. आर्वी, जि. वर्धा

यास ताब्यात घेवून विचारपुस केली त्याने प्रथम उडवा-उडवीचे उत्तर दिले परंतु त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने वरील प्रमाणे गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांस गुन्हयात अटक कररण्यात आली व त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली दुचाकी किं. ३०,०००/- व गुन्हयात चोरी गेलेले सोने अं.१२० ग्रॅम व नगदी १२,००० असा एकुण ७,७५,०००/- रूचा माल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक  प्रदीप ठाकुर, ठाणेदार तिवसा हे करित असुन पुढील तपासात आरोपीस विचारपुस करुन उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यत येईल
सदरची कार्यवाही  विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा,  विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती,  सचिन्द्र शिंदे, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात  किरण वानखडे, पो.नि, .स्था.गु.शा., अमरावती ग्रा.  प्रदीप ठाकुर, पो.नि. तिवसा, पो.उप-नि.पांडे, पो.स्टे. तिवसा तसेच स.पो.नि. सचिन पवार, पो.उप.नि. नितीन चुलपार, संजय शिंदे, मो. तस्लीम, मुलचंद भांबुरकर यांचेसह स्था.गु. शा येथील सर्व पोलीस अमंलदार यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!