कंधार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कंधार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई…

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. या मध्ये (दि.10 एप्रिल) रोजी पोलिस ठाणे कंधार हद्दीमध्ये हातईपुरा, कंधार येथील एका इसमाचे घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा असल्याबाबत पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना खात्रीशीर माहीती मिळाली. त्यांनी मिळालेली माहीती वरीष्ठांना देऊन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कंधार येथे रवाना केले.





(दि.10 एप्रिल) रोजी स्थागुशाचे पथकाने हातईपुरा, कंधार येथील शेख नौशाद शेख ताहेर रा.हातईपुरा, कंधार यांचे घरी पंचासमक्ष जाऊन छापा मारला असता, सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा किमती 1,88,298/- रुपयाचा मिळुन आला. सदरचा गुटखा पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन आरोपी नामे शेख नौशाद शेख ताहेर रा.हातईपुरा, कंधार ता.कंधार, जि.नांदेड याचेविरुध्द पोलीस ठाणे कंधार येथे गुरनं. 130/2024 कलम 328, 272, 273 भा.दं.वि. सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26 (2), 27 सहकलम 30 (2) (अ) 59 (IV) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पो.नि. स्थागुशा नांदेड, सपोनि. रवि वाहुले, पोह. गुंडेराव केले, पोना.विठ्ठल शेळके, बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, मपोना. किरण बाबर,अर्जुनकट स्थागुशा, नांदेड पारपाडे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!