भंडारा येथील कुख्यात गुंड अमन यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

भंडारा येथील कुख्यात गुंड अमन खान यांचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,वर्धा जिल्हा कारागृह  येथे केली रवानगी….

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा येथे राहनारा  अमन उर्फ मस्तान आशिफ खान वय 22 वर्ष रा.बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा ता.जि.भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन भंडारा परीसरातील बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.तो सन 2022 पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्यांचेवर पोलिस ठाणे भंडारा येथे खुनाचा प्रयत्न करणे, चाकुचा धाक दाखवुन पैशाची वसुली करणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व धमकी देणे अश्या प्रकारचे 5 गुन्हे दाखल आहेत.





त्यांचे या कृत्यामुळे भंडारा शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली होती आणि त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या कृत्यांमुळे शहरात त्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.म्हनुन अशा समाज विघातक व्यक्तींवर वेळीच अंकुश बसविने गरजेचे होते. त्याचप्रमाणे सदर प्रकारच्या गुन्हेगारांना कायद्याचे कसोटीत बसवुन त्यांचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात अमन उर्फ मस्तान आशिफ खान वय 22 वर्ष  यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला होता



सदर प्रस्तावास दि. 19/08/2024 रोजी योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, भंडारा यांचे आदेशान्वये उपरोक्त गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अमन उर्फ मस्तान आशिफ खान वय 22 वर्ष रा. बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा यास जिल्हा कारागृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक लोहित मतानी अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात श्री. नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), श्री. गोकुळ सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, भंडारा, पोउपनि दिपक चालुरकर, पो.हवा.राजेश पंचबुधे, पो.ना. अंकोश पुराम, पोना. अजय कुकडे, पोना सुनिल राठोड, पो.अं. नरेंद्र झलके यांनी केली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!