रेती तस्करांवर भंडारा पोलिसांची मोठी कार्यवाही,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करांवर  भंडारा पोलीसांची मोठी कारवाई,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त…

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात पोलिस अधिक्षक, नूरुल हसन हे रुजु झाल्यापासुन त्यांनी रेतीची चोरी तसेच अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात अत्यंत कडक धोरण अवलंबिल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असुन, त्यामुळे भंडारा जिल्हयांतर्गत रेतीचे अवैद्य उत्खनन, चोरी व वाहतुकीवर बऱ्यापैकी अंकुश लागलाय





तरीसुध्दा रेती माफियांनी रेतीची तस्करी करण्याकरीता नविन शक्कल लढवुन गोंदिया जिल्हयातुन रेतीची तस्करी भंडारा जिल्हयांतर्गत वेगवेगळया मार्गाने चालु केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे दि २५/११/२०२४ चे रात्री ०९:३० वा. दरम्यान तिन टिप्पर मध्ये गोंदिया जिल्हयातुन अवैद्य रेतीची तस्करी , दहशतवाद विरोधी पथक तसेच पोलिस स्टेशन, भंडारा येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्गावरील नागपुर नाका येथे संयुक्तरित्या सापळा रचुन, चोरटी रेती वाहतुक करणारे एकुण तिन टिप्पर १) टिप्पर क्रमांक एम.एच. ४० बी.एल. ३०२७, ज्यामध्ये ९ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत ४०,०००/- रु. तसेच टिप्परची किंमत ४५,००,०००/- रु.२) टिप्पर क्रमांक एम.एच. ३६ ए.ए. १२३६, ज्यामध्ये ५ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत २०,५००/- रु. तसेच टिप्परची किंमत १५,००,०००/- रु.३) टिप्पर क्रमांक एम.एच. ३६ एफ. ३४३०, ज्यामध्ये ५ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत २०,५००/- रु. तसेच टिप्परची किंमत १०,००,०००/- रु. असा एकुण १९ ब्रास रेती व तिन्ही टिप्परची किंमत मिळुन ७०,८१,०००/- रु माल जप्त करण्यात आला आहे.



तसेच चोरटी रेती वाहतुक करणारे टिप्पर चे चालक/आरोपी १) दिलीप दौलतजी चचाणे, वय ५४ वर्षे, रा. नवेगाव/चाचेर, ता. मौदा, जि. नागपुर, २) कार्तिक रविंद्र वाडीभस्मे, वय २२ वर्षे, रा. बासोरा/गराडा, ता. जि. भंडारा, ३) अभय अरुण कंगाले, वय २३ वर्षे, रा. ऊरागोंदी, ता. जि. भंडारा यांचे विरुद्ध पो. स्टे. भंडारा येथे अपराध क्रमांक ११६१/२०२४ कलम ३०३ (२), ३ (५) भा.न्या.सं. सहकलम ४८(८) महा. जमिन महसुल अधिनियम, १९६६ सहकलम ७, ९ पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि आरोपींची भंडारा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भंडारा,  प्रशांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी, ठाणेदार, पो. स्टे. भंडारा आणि दहशतवाद विरोधी पथकातील स.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, श्रे. पोउपनि चोपकर, स. फौ. कुरंजेकर, पो.हवा. गभणे, तायडे,पोशि खराबे, चासफौ बावनकर यांनी केलेली असुन, सदर गुन्हयाचा तपास, वरिष्ठांचे मार्गदर्शनात स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पोलिस स्टेशन, भंडारा हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!