तुमसर येथील कुख्यात गुंड शिवांक ठाकुर याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धोकादायक गुंड’ शिवांक प्रविणसिंग ठाकुर याचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,जिल्हा कारागृह वर्धा येथे केले स्थानबध्द…..

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिवांक प्रविणसिंग ठाकुर वय 27 वर्षे रा बोस नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा(महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील बोस नगर तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड व धोकादायक खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. शिवांक प्रविणसिंग ठाकुर हा सन 2018 पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे तुमसर, भंडारा, येथे खुन, खुनाचा प्रयत्न, इच्छापुर्वक दुखापत करणे अशा प्रकारचे 05 गंभिर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.





म्हनुन अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक  लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात शिवांक
प्रविणसिंग ठाकुर वय 27 वर्षे रा बोस नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील बोस नगर तुमसर येथील रहिवासी असुन, तो समाजाला व आजु बाजुच्या परीसरात अत्यंत धोकादायक गुंड’ झाल्याने त्याचे विरुध्द पो.स्टे. तुमसर येथे पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला होता व तो पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे मार्फतीने मा.जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला होता,त्यास दिनांक 14/03/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांनी स्वतहा शहानिशा करुन यास मान्यता दिली व त्यांचे आदेशाने सदर गुंडास ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह वर्धा येथे दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्तींचा गुन्हे अभिलेख तपासुन एम. पी. डी. ए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे.



सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहीत मतानी व अपर पोलिस अधीक्षक  ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी  रश्मिता राव एन. यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा निलेश ब्राम्हणे पोलिस निरीक्षक, पो.स्टे. तुमसर,सफौ धर्मेन्द्र बोरकर,पोहवा.राजेश पंचबुधे,जयसिंग लिल्हारे,नापोशि अंकोश पुराम,मार्कंड डोरले, यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!