मलकापुर MIDC पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतुक करणारे वाहन मलकापुर MIDC पोलिसांनी पकडले,
७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०८/०२/२०२४ रोजी पोस्टे हददीत सपोनि कोळी, पोहवा वैदकर, बावने यांचे सह रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर मिळाली की मारोती स्वीप्ट एम. एच. ४३ ए. एफ.
९८०२ पांढ-या रंगाची हिच्या मध्ये अवैधरित्या गुटखा भरून कु-हा गावाकडुन थुपेश्वर मार्गे हरसोडा रोडने जाणार आहे, अशी खबर मिळाल्यावरून तात्काळ हरसोडा शिवारात जावुन हरसोडा फाटा येथे सापळा लावुन तिथे थांबले असताना दि.०८.०२.२०२४ चे ०१.४५ वा चे सुमारास नमुद मारोती स्वीप्ट एम. एच. ४३ ए. एफ. ९८०२ हे वाहन वेगाने धुपेश्वर रोडकडुन हरसोडा रोडने येतांना दिसले. सदर वाहनाला अडथळा निर्माण करुन हरसोडा फाटयावर प्राथमीक शाळेजवळ थांबविले. सदर वाहनामध्ये महाराष्ट्रात
प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला चा माल असल्याने सदर वाहन चालकास व त्याचे साथीदारास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता पोस्टे एमआयडीसी मलकापुर येथे आणले व पंचाना बोलावुन पंचासमक्ष  वाहन चालक व एक इसम यांचेसमोर पो.स्टे. च्या आवारात सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये खालील प्रमाणे
माल मिळुन आला
१) तीन राखेरी रंगाचे पोते ज्यामध्ये विमल पान मसाला किमंत १,१६,६८८/-₹
२) तीन पांढ-या रगांच्या छोटया पोत्यामधे  वि- १ तम्बाकू किमंत २०,५९२/-₹
३) हिरव्या रंगाच्या छोटया एक पुर्ण व एक अर्धी पिशवी ज्यामध्ये विमल पान मसाला किमंत ६५,३४०/-₹





४) निळया रगांचे एक पुर्ण पोते व एक अर्धे पोते ज्यामध्ये वि- १ तम्बाकू एकुण किमंत ७,२६०/-₹
५) पांढ-या रंगाचे दोन छोटे कटटे आढळुन ज्यामध्ये विमल पान मसाला एकुण किमंत १८,८००/-₹
६) दोन प्लास्टीकच्या पिशव्या आढळुन ज्यामध्ये वि-१ तम्बाकू किमंत १२००/-₹
७) मारोती स्वीप्ट एम. एच. ४३ ए. एफ. ९८०२ वाहन पांढ-या रंगाची किं. अं ५,००,०००/-रु. जुनी वापरती
असा एकुण २,२९,८८०/-₹ चा गुटखा माल व मारोती स्वीप्ट वाहन किं.अं ५,००,०००/-रु.
असा एकुण ७,२९,८८०/- रुपयाचा जप्त करण्यात आला आहे.
सदरबाबत श्री गुलाबसिंग कर्ता वसावे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा जि. बुलढाणा यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून पो.स्टे. एमआयडीसी मलकापूर येथे कलम ३२८,
२७२,२७३,१८८ भादंवि सह अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन. पुढील तपास ठाणेदार हेमराज कोळी हे करित आहेत.सदर गुन्ह्यांत आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागिय पोलिस अधिकारी, मलकापूर विभाग  डी बी गवळी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक  हेमराज कोळी, पोहवा सतिष वैदकर,राजेश बावने पो.स्टे. एम. आय.डी.सी. यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!